शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आयटी कर्मचाऱ्यांच्या 'वर्क फ्रॉम होम' चा घर मालकांना मोठा आर्थिक फटका; भाडेकरू मिळेनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 14:18 IST

खासगी कंपनीतील ८० कर्मचारी हे भाड्याने राहतात...

ठळक मुद्देबहुतांश कर्मचारी हे शहरातून निघून गेल्याने सर्वच व्यवसायांवर परिणामपुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार अशी शक्यता

पिंपरी : आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम असल्याने देशभरातून नोकरीसाठी आलेले कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. खासगी कंपनीतील ८० कर्मचारी हे भाड्याने राहतात. वर्क फ्रॉम होम असल्याने कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. त्यांनी भाड्यांची घरे सोडली आहेत. त्यामुळे शहरातील घर मालकांना भाडेकरू मि‌‌ळत नसल्याची स्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. हिंजवडी भागात आयटी कंपन्या आल्यामुळे शहरात देशभरातून चाकरमानी रोजगारासाठी आले. कोरोनामुळे जवळपास ९ महिने झाले वर्क फ्रॉम होम सुरू आहे. याचा मोठा आर्थिक फटका या भागातील उद्योगांवर झाला आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचारी आपल्या मूळ गावातून काम करत आहेत. कोरोनाच्यापूर्वी हिंजवडी आणि परिसरात भाड्याने फ्लॅट मिळणे कठीण होते. मागणी जास्त असल्याने भाडेदेखील वाढले होते. कोरोनामुळे शहरातील बहुतांश फ्लॅट रिकामे झाले आहेत. त्यामुळे आता भाडे कमी झाले आहेत. हिंजवडी भागात अनेकांनी उत्पन्न मिळावे म्हणून फ्लॅट भाड्याने देणे, हॉस्टेल, रूम भाड्याने देणे आदी व्यवसाय कर्ज काढून सुरू केले आहेत. परंतु सध्या भाडेकरू नसल्याने या लोकांचे उत्पन्न थांबले आहे. सर्वच नामांकित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी आवश्यक लागणारे साहित्य दिले आहेत. पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार अशी शक्यता आहे.

---इतर व्यवसायावर झाला परिणाम

खासगी क्षेत्रात काम करणारे बहुतांश कर्मचारी हे शहरातून निघून गेल्याने सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट, हॉटेल, खासगी कार वाहतूक, हिंजवडी भागातील लहान व्यवसाय, खानावळी आदी व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.--

भाडे झाले कमीपूर्वी                                          आता

१ बीएचके १२ हजार                 ८ ते ९ हजार२ बीएचके १५ ते १७ हजार       १२ हजार

--वर्क फ्रॉम होम असल्याने बहुतांश कर्मचारी गावी गेले आहेत. ८० टक्के कर्मचारी भाड्याने राहत होते. त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंजवडी भागातील हॉस्टेल्स सध्या रिकामे आहेत. रिअल इस्टेट व्यवसायाला याचा फटका बसला आहे.- संतोष मांदळे, रिअल इस्टेट एजंट; 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याITमाहिती तंत्रज्ञानhinjawadiहिंजवडीHomeघरbusinessव्यवसाय