शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई! तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 20:32 IST

तक्रारी अर्जाकडे दुर्लक्ष करणे पोलिस अधिकाऱ्याला भोवले...!

पिंपरी : माथाडी कामगारांच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. तसेच उद्योजक, नागरिकांनी तक्रार करण्यास पुढे यावे, असे आवाहनही केले. त्यानुसार माथाडी संघटनांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. मात्र त्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. या कारणावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षकास तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (krishna prakash) यांनी याबाबतचे आदेश दिले. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे (shivaji gaware) असे नियंत्रण कक्षाशी संलग्न केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. शहरातील एमआयडीसीच्या काही भागात माथाडी संघटनांमध्ये धुसफूस आहे. दरम्यान, काही माथाडी संघटना कंपन्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत असल्याच्या तक्रारी देखील पोलिसांकडे आल्या होत्या. या तक्रारींची वेळीच दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. 

माथाडी संघटनेच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज करण्यात आला. या अर्जाकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दुर्लक्ष केले. या कारणावरून वरिष्ठ निरीक्षक गवारे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले.   हप्ता वसुली करणे भोवले-हप्ता वसुली करणे एका पोलीस कर्मचाऱ्याला भोवले. वाकड वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी सचिन खोपकर हा खासगी बस चालकांकडून हप्ते वसूल करीत असल्याची तक्रार करण्यात आली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर काही प्रमाणात तथ्य आढळून आले. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस कर्मचारी खोपकर याला देखील नियंत्रण कक्षाशी संलग्न केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी