ख्रिस्ती बांधवांवरील हल्ल्याचा निषेध

By Admin | Updated: March 29, 2017 02:17 IST2017-03-29T02:17:39+5:302017-03-29T02:17:39+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कारवे या गावी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिस्ती बांधवांवर झालेल्या भ्याड

Invasion of Christian Brothers | ख्रिस्ती बांधवांवरील हल्ल्याचा निषेध

ख्रिस्ती बांधवांवरील हल्ल्याचा निषेध

पिंपरी : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कारवे या गावी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिस्ती बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने येथे निषेध करण्यात आला.
पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली व ख्रिश्चन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश चिटणीस मॅन्युएल डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. साठे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत ख्रिश्चन समाजाला सरकारने संरक्षण द्यावे वहल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा गिरिजा कुदळे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र वालिया, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सरचिटणीस कल्पना खंडागळे, उपाध्यक्ष तारिक रिजवी, अल्पसंख्याक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, चिटणीस भाऊसाहेब मुगुटमल, पुणे शहर अल्पसंख्याक उपाध्यक्षा जॅकलीन फॉरस्टर, अमितेश गडगे, जोसेफ पॉल, अ‍ॅड. अनिरुद्ध कांबळे, मयूर जैस्वाल, सुनील राऊत, मकरंद यादव, प्रदीप पवार, संदेश बोर्डे, फ्रान्सिस गजभीव, मायकल नाडार, सन्नी मकवाना, डेविड काळे, आशिष जाधव, सँडरा डिसोझा, सियोना बोर्डे, सचिन गवारे, प्रकाश पठारे, श्याम शेट्टी, अत्ताउल्ला पीरजादे आदी उपस्थित होते. फ्रान्सिस गजभीव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Invasion of Christian Brothers