पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन दोनच्या उपायुक्तांसह सांगवी, देहूरोड, निगडी, चिंचवड, सांगवी ठाण्याचे निरीक्षक, तसेच दोन सहायक निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक यांची पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी बदली केली.पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली मुख्यालयात करण्यात आली असून, त्यांच्या जागी मुख्यालयातील उपायुक्त विनायक ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांची बदली वाहतूक शाखेत केली असून, त्यांच्या जागी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निगडीचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप लोंढे यांची बदली चिंचवड वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी, तर लोंढे यांच्या जागी देहूरोडचे निरीक्षक (गुन्हे) अमरनाथ वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगवीचे निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्तांसह निरीक्षकांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 01:10 IST