शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 16:57 IST

तात्काळ पंचनामे करून बाधित सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना..

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे जवळपास अडीच हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य

मावळ :मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.खासदार श्रीरंग बारणे यांनी अंदर मावळातील टाकवे, माऊ, वडेश्वर या गावतील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी हरीश्चंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी ढगे, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, रोहिदास अस्वले, यशवंत तुरडे, शांतराम लष्करे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. मावळ तालुक्यात यावर्षी 12 हजार हेक्टर जमिनीवर भात शेतीची लागवड झाली आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास अडीच हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेतीवर अवलंबून आसणा-या शेतक-यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मावळ परिसरात प्रामुख्याने भातशेती केली जाते. मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. या भातशेतीची  बारणे यांनी पाहणी केली. ज्या भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, त्या भागात प्रशासनाने जाऊन तात्काळ पंचनामे करावेत. बाधित झालेल्या सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. कोणताही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.तहसीलदार मधुसूदन बर्गे म्हणाले, "अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य केले जाईल. शासन निर्णयानुसार आर्थिक मदत केली जाईल. संपूर्ण तालुक्यामध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम चार ते पाच दिवसांपासून सुरू झाले आहे. हे काम पुढील दोन दिवसात पूर्ण करून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अहवाल सादर केला जाणार आहे. सर्व बाधित शेतक-यांना मदत केली जाईल, अशी खात्री देखील त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :mavalमावळFarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकार