शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

औद्योगिक सुरक्षा कार्यालयच झाले असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:28 AM

मुंबई व राज्यातील विविध शहरांत आगीच्या घटना घडल्यानंतर शासनाने फायर आॅडिट करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, महाराष्ट्र कामगार मंडळाच्या चिंचवड

स्वप्निल हजारे पिंपरी : मुंबई व राज्यातील विविध शहरांत आगीच्या घटना घडल्यानंतर शासनाने फायर आॅडिट करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, महाराष्ट्र कामगार मंडळाच्या चिंचवड (संभाजीनगर) येथील कार्यालयाच्या बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला नाही. तसेच, फायर प्रतिबंधक व्यवस्था निकामी आहे. या असुरक्षित इमारतीत औद्योगिक सुरक्षा विभागाचे कार्यालय भाडेतत्त्वावर सुरू आहे.पिंपरी-चिंचवड ही उद्योग व कामगारनगरी आहे. या ठिकाणी एमआयडीसीमुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाने चिंचवड येथे कार्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही इमारत उभारून अनेक वर्षे झाली. मात्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेता दोन वर्षांपासून इमारतीचा वापर सुरू आहे.शासकीय कार्यालयांना अग्निशामक यंत्रणा सक्तीची असताना ती अपूर्ण अवस्थेत उभारलेली आहे. या इमारतीमध्ये कामगारवर्ग कुटुंबीयांसह अनेकदा येतो. मात्र, त्यांची सुरक्षा वाºयावर आहे. त्यात भर म्हणून महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय या इमारतीत सुरू करण्यात आले आहे.सुरक्षा विभागाच्या कार्यालयाकडून शहरातील व औद्योगिक कारखान्यांची सुरक्षेचे आॅडिट केले जाते. जर सुरक्षा विभागाचे कार्यालयच फायर आॅडिट न झालेल्या असुरक्षित इमारतीत असेल, तर ते इतर कारखाने, उद्योग व कार्यालयाचीतपासणी कशी काय करू शकतील, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते बाबूराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.या इमारतीत मंडळाचेविविध कार्यक्रम, योग वर्ग, महिला शिवण यंत्रवर्ग, बालवाडीला येणारी लहान मुले, अभ्यासिकेत येणारे विद्यार्थी व विविध योजनांच्या कामाकरिता येणारे कामगार व कुटुंबीय यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.