महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 07:10 PM2020-01-30T19:10:42+5:302020-01-30T19:14:47+5:30

लोक प्रतिनिधी जागरुक असेल तरच तो समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास करु शकतो.

India will be Superpower when women are empowered : Devendra Fadnavis | महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता : देवेंद्र फडणवीस 

महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता : देवेंद्र फडणवीस 

googlenewsNext
ठळक मुद्देभोसरीतील इंद्रायणी थडी जत्रा

पिंपरी : महाराष्ट्रात युतीचे सरकार २०१४ला स्थापन झाले तेंव्हा साडेतीन लाख कुटूंब बचतगटात होती. आता चाळीस लाख कुटूंब बचतगटांच्या माध्यमातून जोडली गेली आहेत. त्यातील अनेक बचतगटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाचा लाभ मिळाला आहे. त्यातून हजारो महिला आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सक्षम झाल्या आहेत. महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता होईल आणि विकासाचा दर दुप्पट गाठता येईल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी येथे केले.
भोसरीतील इंद्रायणी थडी जत्रेत ते बोलत होते. यावेळी प्रतिक्षा लांडगे (कबड्डी), सह्याद्री  भूजबळ (गियार्रोहक), आकाश  बांदल (कलाकार), सुरेश  चिंचवडे (सामाजिक) यांना पुरस्कार प्रदान केला.  ((लोक प्रतिनिधी जागरुक असेल तरच तो समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास करु शकतो.

राजकारण हे साधन आहे. त्यातूनच समाजाच्या शेवटच्या घटकांचा विकास लोक प्रतिनिधी करु शकतो. असा लोक प्रतिनिधी जनतेच्या मनात घर करीत असतो, असे सांगताना लोकप्रतिनिधी कसा असावा हे फडणवीस यांनी सांगितले.
मी डायटींगवर  : फडणवीस
जत्रेतील खाद्य विक्रीचे स्टॉल पाहून फडणवीस म्हणाले, समोरच खूप आईस्क्रीम, खाद्य विक्रीचे स्टॉल दिसत आहेत. परंतु त्याचा आस्वाद आम्ही घेऊ शकत नाही. कारण मी सध्या डायटींग वर आहे.

Web Title: India will be Superpower when women are empowered : Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.