शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

मोशीत रंगणार भारत विरुद्ध इराण मल्लयुद्ध; महापालिकेची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:43 PM

मोशी येथील कृषी प्रदर्शन मैदानावर उभारलेल्या भव्य कुस्ती आखाड्यात रविवारी दुपारी दोन वाजता आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देकुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हणुमंत गावडे यांनी स्पर्धेची माहिती दिली.स्पर्धेत इराणचे रैझाहैदरी, सईद मोहम्मद घोली, जावेद शबानी, जलाल शबानी हे इराणचे मल्ल सहभागी होणार

पिंपरी : महापालिकेच्यावतीने आणि पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. मोशी येथील कृषी प्रदर्शन मैदानावर उभारलेल्या भव्य कुस्ती आखाड्यात रविवारी दुपारी दोन वाजता आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने आखाड्यावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कुस्ती स्पर्धेत इराणचे रैझाहैदरी, सईद मोहम्मद घोली, जावेद शबानी, जलाल शबानी हे इराणचे मल्ल सहभागी होणार आहेत. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हणुमंत गावडे यांनी स्पर्धेची माहिती दिली. भारत विरूद्ध इराण असे मल्लयुद्ध पिंपरी चिंचवडच्या आखाड्यात रंगणार आहे. महापालिका, जयगणेश युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हिंद केसरी जोगिंदर कुमार, राष्ट्रीय पदक विजेते प्रसाद सस्ते, राजू हिप्परकर, किरण भगत, हिंद केसरी जस्सा पट्टी, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रविण भोला, भारत केसरी प्रवेश कुमार हे देशातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत प्रमुख १४ कुस्त्या होणार आहेत. इराणचा मल्ल रैजा हैदरी याच्याशी हिंद केसरी जोगिंदर सिंग याची लढत होणार आहे. सईद मोहम्मद घोली याच्याशी प्रसाद सस्ते, जावेद शबानी विरूद्ध राजू हिप्परकर तसेच जलाल शबानी विरूद्ध राहुल आवारे लढत देणार  आहे. महापालिकने ७० बाय ७० मीटरचे भव्य असे मातीचे मैदान उपलब्ध करून दिले आहे. स्वतंत्र विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. २० हजार असान क्षमतेचे हे मैदान कुस्ती शौकीनांसाठी पर्वणी ठरणार आहे. पालकमंत्री गिरीष बापट आणि शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रविवारी दुपारी दोनला उद्घाटन होणार आहे. स्पर्धेत लहान मोठ्या अशा १३० कुस्त्या होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्पर्धा होणार आहे. अर्धा तास कुस्तीसाठी वेळ दिला जाणार आहे. कुस्ती निकाली नाही झाली तर, त्यासाठी ३ मिनिटांचे दोन राऊंड देऊन ज्याला अधिक गुण मिळतील, त्याला विजेता घोषित केले जाणार आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड