खामगावचे मल्ल जिल्हा स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:26 AM2017-08-28T00:26:16+5:302017-08-28T00:28:03+5:30

खामगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त  विद्यमाने, तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा स्थानिक अंबिका  क्रीडा मंडळाच्या हॉलमध्ये २२ ऑगस्ट रोजी पार पडल्या. स्पर्धेचे  उद्घाटन तालुका संयोजक चव्हाण, विशाल बोरसल्ले यांच्या हस्ते  झाले. प्रमुख उपस्थिती अढाव, कापसे, सावतकर, नाजीम, राजू  पॉल यांची होती.

Khamgaon Malla at the district level | खामगावचे मल्ल जिल्हा स्तरावर

खामगावचे मल्ल जिल्हा स्तरावर

Next
ठळक मुद्देअंबिका क्रीडा मंडळाच्या हॉलमध्ये पार पडल्या स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त  विद्यमाने, तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा स्थानिक अंबिका  क्रीडा मंडळाच्या हॉलमध्ये २२ ऑगस्ट रोजी पार पडल्या. स्पर्धेचे  उद्घाटन तालुका संयोजक चव्हाण, विशाल बोरसल्ले यांच्या हस्ते  झाले. प्रमुख उपस्थिती अढाव, कापसे, सावतकर, नाजीम, राजू  पॉल यांची होती.
या स्पर्धेत नगर परिषद व्यायाम शाळेच्या मल्लांमध्ये १४ वर्षांआतील  ४१ किलो वजन गटात शे.इकराम शे.बल्लू, १७ वर्षांआतील ४२  किलो वजन गटात सैयद साजीक सै. सादीक, ५0 किलो  वजनगटात शे. साहिल शे.अकबर, ६३ किलो वजन गटात रितेश  विजय माळवंदे १९ वर्षांआतील ४६ किलो वजन गटात प्रतीक  मोहन शेगोकार यांनी विजय संपादन केला.  या मल्लांना खामगाव र त्न पुरस्कार प्राप्त बाबासाहेब भोसले पहिलवान, रणजितसिंह  बयस, इब्राहीम पहिलवान, कुस्तीचे प्रशिक्षक राजेंद्र शेगोकार,  पहिलवान शे.बल्लू शे.नासीर पहिलवान यांचे मार्गदर्शन लाभले. हे  मल्ल ६ सप्टेंबर रोजी आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. 

Web Title: Khamgaon Malla at the district level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.