शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

वाढती स्पर्धा, कामाचा ताण होतोय असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 3:00 AM

आॅफिसमध्ये कामाची वेळ टळून गेल्यानंतर देखील बॉसच्या सांगण्यानुसार मान मोडेपर्यंत करावे लागणारे काम, कामावरुन दमून भागून घरी गेल्यानंतर लगेच अंथरुणावर टेकलेली पाठ, ना कुणाशी बोलणं, ना कुणाशी संवाद, सकाळी उठल्यानंतर डबा घेतल्यानंतर पुन्हा आॅफिस. एका ठरावीक काळात मर्यादित लक्ष्य गाठण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या व्यक्तीला दोन घटका हसण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

- युगंधर ताजणे 

पुणे -  माकडछाप दंतमंजन,तोच चहा तेच रंजनतीच गाणी तेच तराणे,तेच मूर्ख तेच शहाणेसकाळपासून रात्रीपर्यंततेच ते तेच ते....ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं़दा़ करंदीकर यांच्या या कवितेत सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनमानाची जी कल्पना केली आहे ती सध्याच्या काळाला तंतोतंत लागू होते. आॅफिसमध्ये कामाची वेळ टळून गेल्यानंतर देखील बॉसच्या सांगण्यानुसार मान मोडेपर्यंत करावे लागणारे काम, कामावरुन दमून भागून घरी गेल्यानंतर लगेच अंथरुणावर टेकलेली पाठ, ना कुणाशी बोलणं, ना कुणाशी संवाद, सकाळी उठल्यानंतर डबा घेतल्यानंतर पुन्हा आॅफिस. एका ठरावीक काळात मर्यादित लक्ष्य गाठण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या व्यक्तीला दोन घटका हसण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.सातत्याने आजूबाजूला वाढणारी तीव्रस्पर्धा, त्याला सामोरे जाताना येणारे अपयश, त्यामुळे तोंड द्यावे लागणा-या नैराश्यावर प्रभावी औषध असणाºया ‘‘हसण्याचा’’ सर्वांना विसर पडू लागला आहे. उपलब्ध माध्यमांतून देखील फार प्रभावीपणे आपली हसण्याची गरज पूर्ण होते असे चित्र सध्या नाही.दैनंदिन आयुष्यात व्यक्ती मात्र आपल्या हसणे या नैसर्गिक भावनेला विसरला. दिवसभरातील कामाचा शिण उरकून घरी आल्यानंतरदेखील कुटुंबाच्या जबाबदारीत तो अडकून पडला. या सगळ्यात हसण्याकरिता त्याला निमित्त शोधावे लागले. ते भेटेना म्हणून टी़ व्ही़ वर दाखविल्या जाणाºया विनोदी मालिकांचा आधार घेतला. काही दिवसांनी त्यातील सुमार सादरीकरणाने त्याचा रस संपला. याबाबत मनोविकार तज्ज्ञ म्हणतात, ‘‘माणसाला आपले मन प्रसन्न आणि संतुलित ठेवण्याकरिता एखादा का होईना छंद जोपासावा लागतो. तसे न झाल्यास त्याचे मानसिक आरोग्य डळमळते. तो चिडचिड करु लागतो. पूर्वी आजच्या इतकी मोठी स्पर्धा नव्हती. माणसे एकमेकांशी बोलत होती, छंद जोपासत होती. त्या छंदांवर संवाद साधत तो वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशीलदेखील होती. आता तसे राहिले नाही.सोशल माध्यमांवरील एखादा मेसेज हा त्यांना हसण्याकरिताची एक ‘‘गोळी’’ म्हणून उपयोगी पडतो. छंदाची आवड, त्या आवडीचे सवयीत होणारे रुपांतर तो कायमस्वरुपी जपण्यासाठी केलेली भटकंती त्यानिमित्ताने अनेकांशी झालेल्या भेटीगाठी, त्याचा संवाद , त्या संवादातील निखळ हसणे ही सर्व प्रक्रिया मंदावत चाललेली दिसून येते. हे चित्र एकूणच सध्याच्या व्यक्तीच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्याकरिता धोकादायक ठरते आहे. मनोविकारतज्ज्ञ डॉ. अमृता करांडे पाटील म्हणाल्या की, हसणं ही माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. माणसाने उस्फूर्त हसावं याकरिता थेरपी अशी नाही. आताच्या हास्यक्लबच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे आरोग्य संतुलित राहते. त्या क्लबमध्ये गेल्यानंतर व्यक्ती मनसोक्त हसतो. आताच्या युगात आपण प्रचंड ताणतणावाखाली आहोत. त्यातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीने काही आवडी निवडी जोपासल्या पाहिजेत. ज्यामुळे त्याला काही काळ का होईना निवांतपणा मिळेल.हास्य क्लब ही संकल्पनाच पटत नाहीमाणसाला हसण्यासाठी एखादा क्लब आणि त्यात जाऊन मोठमोठ्याने हसणे ही संकल्पनाच पटत नाही. आपल्या आजूबाजूला खळखळून हसावं अशी परिस्थिती उरलेली नाही. हे सत्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला हसण्यासाठी खूप निमित्तं शोधावे लागतात. त्या हास्यक्लबमध्ये ज्यापद्धतीने हास्याची कारंजी फुलतात त्या हसण्याला लागू असलेली शास्त्रीय बैठक पटत नाही. हल्ली हास्यउपचार करावा लागतो. ही एक नवीन संशोधन पद्धती आली आहे.- विद्याधर वाटवे, मनोविकारतज्ज्ञखासकरुन मोठ्याने हसल्याने चेहºयावरील स्नायू सैल होतात. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत होतो. हास्य क्लब ही संकल्पना चांगली आहे. त्यातून व्यक्तीच्या भावनांना मोकळी वाट करुन दिली जाते.- डॉ. अमृता करांडे- पाटीलतीन वर्षाचे मूल दिवसातून तीनशे वेळा हसते.प्रौढ व्यक्ती दिवसात सुमारे तेरा वेळा हसते.८० टक्के आजारांचे मूळ मानसिक ताणतणाव हे आहे.मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी हास्य उपयोगीहसणे हे एक प्रकारचे विज्ञान असून त्याला जेलोटोलोजी म्हणतात.व्यायामासाठी तरी प्रत्येकाने रोज हसायला हवे.हसण्यासाठी १७ स्नायूंचा वापर होतो तर रागावण्यासाठी ४३ स्नायूंचा वापर होतो.हसण्यामुळे रक्ताभिसरण संस्थेला फायदा होतो.हसण्यामुळे रक्तदाबही कमी होतो.हसणाºया व्यक्तीचे आयुर्मान वाढते.

टॅग्स :World Laughter Dayजागतिक हास्य दिनPuneपुणे