शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आयटी अभियंते तणावाच्या गर्तेत, आयटीनगरीत वाढल्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 3:23 AM

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत़ आर्थिक ओढाताणीमुळे नैराश्याच्या गर्तेतील अनेक जण जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतात.

- संजय मानेपिंपरी - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत़ आर्थिक ओढाताणीमुळे नैराश्याच्या गर्तेतील अनेक जण जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतात. या उलट परिस्थिती असलेल्या आयटी क्षेत्रात काम करणारे सुखवस्तू कुटुंब, तसेच मुबलक पैसा हाती खेळत असल्याने भौतिक सुखांची रेलचेल आहे, अशा परिस्थितीतही अभियंते आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाढता ताणतणाव, आयटीतील नवीन आव्हाने व बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याचे मनोबल नसल्याने आयटी अभियंत्यांच्या बाबतीत अशा घटना घडत असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.शिक्षण संपवून करिअर सुरू केल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वयाची विशी ओलांडलेले आणि पस्तीशीच्या टप्प्यातील आयटी अभियंते आणि आयटी क्षेत्रात काम करणाºया तरुणीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन जगाचा कायमचा निरोप घेत आहेत. मूळ गाव सोलापूर. परंतु, करिअर घडविण्यासाठी पुण्यात आलेल्या पूजा नागनाथ वाघमारे या २३ वर्षे वयाच्या आयटी अभियंता तरुणीने मारुंजी येथीलसदनिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली़ त्यामुळे आयटी अभियंता तरुण, तरुणींच्या मानसिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.वाकड येथील ºिहदम सोसायटीत राहणाºया ३५ वर्षे वयाच्या आनंद वासुदेव यादव या आयटी अभियंत्याने राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. अशा काही घटना वर्षभरात वाकड, हिंजवडी आणि पिंपळेगुरव परिसरात घडल्या आहेत.ठाणे येथे वडील बांधकाम व्यावसायिक, कौटुंबिक-आर्थिक स्थिती चांगली. पत्नीने घटस्फोट घेतल्याने आनंदचे मानसिक संतुलन ढासळले. दरम्यान, ठाण्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. तिच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या आनंदने आत्महत्येचा मार्ग निवडला.आयुष्याची सुरुवात करण्याच्या टप्प्यावर आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेण्याचे प्रमाण आयटी अभियंत्यांमध्ये वाढू लागले आहे. आयटी अभियंत्याकडे भौतिक सुख व सोयी असल्यातरी मानसिक ताणतणाव व परिस्थितीला समोरे जाण्याचे मनोबल नसल्याने त्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे समुपदेशकांचे मत आहे.आत्महत्या करणारे आयटी अभियंता तरुण, तरुणी यांची आत्महत्येची कारणे जरी वेगवेगळीअसली तरी त्यांच्यात नैराश्य येण्याची काही कारणे सर्वसाधारणच आहेत. कमी वयात हातात खुळखुळणारा गरजेपेक्षा अधिक पैसा, कुटुंबापासून दूर राहत असल्याने वर्तणुकीत येणारा बेतालपणा, सहनशीलतेचा अभाव, नकार पचविण्याची नसेलेली क्षमता या प्रमुख कारणांमुळे आयटी अभियंते आत्महत्येच्या वाटेवर असल्याचे जाणवू लागले आहे. पालकांपासून दूर, त्यातच अचानक जीवनशैलीत होत गेलेला बदल, व्यसनाधीनता, चुकीच्या मार्गाने नेणाºया मित्र मंडळींची संगत यामुळे सर्व काही असूनही आयटी क्षेत्रात काम करणाºया अभियत्यांवर नैराश्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येते. योग्य वेळी योग्य प्रकारचे मार्गदर्शन, समुपदेशन होत नसल्याने त्यांना टोकाच्या निर्णयापासून वाचविण्याची वेळ निघून गेलेली असते. या कारणांमुळे आयटी अभियंते आत्महत्येच्या वाटेवर आहेत, असा निष्कर्ष निघतो.किशोर गुजर, मानसोपचार तज्ज्ञतीन महिन्यांत चार घटनाहिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाºया अभिषेककुमार राजेशकुमार यादव (वय २३, रा. माण, मूळ बिहार) या अभियंत्याने राहत्या सदनिकेत पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना याच परिसरात घडली. इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून जिशन नासीर शेख २७ वर्षे वयाच्या अभियंत्याने आत्महत्या केली. पिंपळे गुरव येथील या घटनेनंतर काही दिवसांतच मेकॅनिकल इंजिनिअर पदावर काम करणाºया निनाद देशभूषण पाटील या २४ वर्षे वयाच्या अभियंत्याने रहाटणीतील वर्धमान हाईटस या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शहरवासीयांच्या अद्याप विस्मृतीत गेलेली नाही. विदर्भातून आयटी कंपनीत नोकरी करण्यासाठी पुण्यात आलेल्या मीनल अशोक देशमुख या २८ वर्षाच्या तरुणीने विवाह काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :Suicideआत्महत्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या