शहरातील फलाटाची लांबी वाढविणार

By Admin | Updated: March 4, 2016 00:22 IST2016-03-04T00:22:40+5:302016-03-04T00:22:40+5:30

लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फलाटांची लांबी वाढविणे, लोणावळ्यात प्रादेशिक रेल्वे संग्रहालय, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत व नाणे मावळ यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील ४३ नंबर रेल्वे क्रॉसिंगवर

Increase the length of the plot in the city | शहरातील फलाटाची लांबी वाढविणार

शहरातील फलाटाची लांबी वाढविणार

पिंपरी : लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फलाटांची लांबी वाढविणे, लोणावळ्यात प्रादेशिक रेल्वे संग्रहालय, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत व नाणे मावळ यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील ४३ नंबर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारणे यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
लोकमतने आता बास उपक्रमांतर्गत पुणे-लोणावळा लोहमार्गाचे प्रश्न मांडले होते. याबाबत पुढकार घेऊन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरा केला. तिसऱ्या मार्गाचे सर्वेक्षण करण्यासह मावळातील प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लागले आहेत.
याविषयी माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, ‘‘रेल्वे अर्थसंकल्पात अनेक कामांना मंजुरी मिळाली. मुंबई-पुणे या महत्त्वाच्या दोन शहरांना जोडणाऱ्या पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गावर तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी केलेल्या मागणीला गतवर्षी मंजुरी मिळाली. त्यासाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. पुणे- नाशिक २६५ कि.मी. लांबीचा अनेक वर्षे प्रतीक्षेतील मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे- नाशिक ही महाराष्ट्रातील महत्त्वाची दोन शहरे जोडली जाणार असून, हा मार्ग मावळातील भेगडेवाडी स्थानकापासून नव्या रेल्वेमार्गांद्वारे चाकणला जोडून नाशिकपर्यंत जात असून, याचा फायदा पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्यातील उद्योगवाढीस होणार आहे. वाहतूक सुविधेच्या अंतर्गत लोणावळा रेल्वे स्थानकावर २४/२८ डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी फलाटाची लांबी वाढविण्याकरिता मंजुरी मिळाली आहे. कामशेत व नाणे मावळ यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील ४३ नंबर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्यासाठी तरतूद केली आहे. गेल्या वर्षभरात लोकलमधून पडून अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. याबाबत मागणी केली होती.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Increase the length of the plot in the city