शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बँकांच्या नावाखाली फसवणुकीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 23:54 IST

संवादाच्या जाळ्यात फसवून भामटे हवी ती माहिती मिळवतात व त्या खात्यावरील रक्कम क्षणात काढून घेतात.

मोशी : बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची माहिती घेऊन लाखोंचा गंडा घातला जात असल्याच्या प्रकारात शहरात वाढ झाली असून, अशा भामट्यांकडून मध्यमवर्गीय कुटुंबातील खातेदारांना लक्ष केले जात आहे.

संवादाच्या जाळ्यात फसवून भामटे हवी ती माहिती मिळवतात व त्या खात्यावरील रक्कम क्षणात काढून घेतात. किंवा आॅनलाइन महाग वस्तू खरेदी करतात. यामुळे सामान्यांच्या कष्टाची कमाई अशी क्षणात हस्तांतरीत होत असून, शहरातही अशा प्रकारात वाढ होताना दिसून येत आहे. शक्यतो अशा प्रकारच्या घटना मध्यमवर्गीयांमध्ये जास्त घडत असून, बँकिंग साक्षरतेचा अभाव असल्यामुळे काही ग्राहक याला बळी पडताना दिसतात. जी सुज्ञ आणि सुशिक्षित तरुण असतात ती अशा कॉशलेसला उत्तरे देत नाहीत. भामट्यांकडून एटीएमची माहिती घेऊन आॅनलाइन महागड्या वस्तू खरेदी केल्या जातात व त्याच वस्तू कमी किमतीत विकल्या जातात. जादातर असा गुन्हा करणारे गुन्हेगारही तरुण असून, शिक्षणाचा उपयोग गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. असा गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारे सीम हे चोरी केलेली कागदपत्रे देऊन खरेदी करण्यात येत असल्याने पोलीस यंत्रणेलाहीखरे गुन्हेगार पकडणे अवघड जाते. या गुन्ह्यांवर निर्बंध आणणे अवघड असून, सतर्कता हाच या पासूनचा उपाय आहे.संपर्क साधून बँक अधिकारी असल्याचे भासवले जाते. एटीएम कार्डवरची माहिती विचारली जाते. यामध्ये कार्ड नंबर, सीवी नंबर, समाप्ती डेट, कार्डवरचे नाव व पासवर्ड विचारला जातो. सदर माहिती मिळवताच हे भामटे आँनलाइन शॉपिंग किंवा बनावट कार्ड बनवून खात्यातील रक्कम लंपास करतात. त्यानंतर ज्या नंबरवरून संपर्क साधण्यात आला होता ते सीम कायमचे बंद करण्यात येते. 

टॅग्स :bankबँकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी