विद्यार्थ्याची पोलीस महिलेला मारहाण, डांगे चौक येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:45 IST2017-09-01T23:45:36+5:302017-09-01T23:45:52+5:30

बसमधून उतरताना झालेल्या वादवादीतून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट महिला पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की करीत कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार (दि.१) सकाळी नऊच्या सुमारास थेरगावातील डांगे चौक येथे घडला.  

The incident happened in the police station of the student, Dange Chowk | विद्यार्थ्याची पोलीस महिलेला मारहाण, डांगे चौक येथील घटना

विद्यार्थ्याची पोलीस महिलेला मारहाण, डांगे चौक येथील घटना

वाकड, दि. 01 : बसमधून उतरताना झालेल्या वादवादीतून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट महिला पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की करीत कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार (दि.१) सकाळी नऊच्या सुमारास थेरगावातील डांगे चौक येथे घडला.  
       याप्रकरणी महिला पोलीस कर्मचा-याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून  सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी सालेर शेख (वय २०, रा. गणेशनगर, थेरगाव) या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. 
       याबाबत वाकडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन यांनी दिलेल्या माहिती नुसार त्या पोलीस शिपाई पीएमपी बसमधून डांगे चौक बस स्टॉपवर उतरत असताना शेख धक्का बुक्की करित जबरदस्ती बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा धक्का महिला पोलीस कर्मचा-याला 
लागला त्यावरून झालेल्या बाचाबाचित चिडलेल्या सालेर शेखने यांना 'तुझ्यासारखे खूप पोलीस पाहिले असे म्हणत' मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद म्हटले आहे शेख हा पुण्यातील एक नामांकित विद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.

Web Title: The incident happened in the police station of the student, Dange Chowk

टॅग्स :Crimeगुन्हा