शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत 'पीएमएवायमध्ये आता हक्काचं मोठं घर,उत्पन्न मर्यादेमध्येही वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:03 IST

- योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना ३० चौरस मीटर चटई क्षेत्राची सदनिका देण्यात येत होती. मात्र, पीएमएवाय २.० अंतर्गत आता ४५ चौरस मीटर क्षेत्रफळाचे घर देण्यात येणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील शहरी गरजू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत आता अधिकाधिक कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या टप्प्यात केवळ घराचे क्षेत्रफळ वाढवण्यात आलेले नाही, तर उत्पन्न मर्यादेतही लक्षणीय वाढ करून अधिक नागरिकांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

आता मिळणार अधिक मोठे आणि दर्जेदार घर

योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना ३० चौरस मीटर चटई क्षेत्राची सदनिका देण्यात येत होती. मात्र, पीएमएवाय २.० अंतर्गत आता ४५ चौरस मीटर क्षेत्रफळाचे घर देण्यात येणार आहे. त्यामुळे कुटुंबांना अधिक मोकळे, व्यवस्थित आणि सुसज्ज घर मिळेल. केवळ आकारातच नव्हे, तर गृहप्रकल्पांच्या गुणवत्तेमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे.

उत्पन्न मर्यादेत वाढ - अधिक नागरिकांना लाभ

पूर्वी फक्त ३ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांनाच योजनेचा लाभ मिळत होता. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे अपात्र ठरत होती. आता ही मर्यादा ६ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे, जे या शहरातील अनेक नोकरी करणाऱ्या नागरिकांसाठी फार मोठा दिलासा आहे. परिणामी, हजारो नवोदित कुटुंबांना स्वतःचे घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.शहरात नऊ ठिकाणी प्रकल्प – टप्प्याटप्प्याने राबवणार योजनेची अंमलबजावणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने या योजनेंतर्गत नऊ ठिकाणी भूखंड आरक्षित केले असून, त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने गृहप्रकल्प उभारले जाणार आहेत. आधीच चऱ्होली, आकुर्डी, बोऱ्हाडेवाडी आणि पिंपरी येथे प्रकल्प पूर्ण झाले असून, डुडूळगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. रावेतमधील प्रकल्प रद्द झाला असला, तरी त्या लाभार्थ्यांना किवळेमधील सदनिका देण्यात येत आहेत. 

उत्पादनात वाढ - बांधकाम क्षेत्राला चालनाया योजनांमुळे केवळ नागरिकांना हक्काचे घर मिळणार नाही, तर बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. सदनिकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढेल, तसेच अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. सिमेंट, लोखंड, विजेची उपकरणे, फर्निचर, वॉटर फिटिंग्स यांसारख्या उत्पादनांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. 

झोपडपट्टीवासीयांचा समावेश - समाजमुखी पाऊलपीएमएवाय २.० मध्ये पात्र झोपडपट्टीवासीयांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने ‘घर सबका’ हे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित ९ भूखंड आणि एचडीएचअंतर्गत निश्चित भूखंडांवर हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. 

या योजनेचे ठळक फायदे :सदनिकेच्या क्षेत्रफळात वाढ : ३० चौरस मीटरवरून ४५ चौरस मीटर

उत्पन्न मर्यादेत वाढ : ३ लाख वरून ६ लाख रुपयेझोपडपट्टीवासीयांनाही संधी : पात्रतेनुसार समावेश

बांधकाम क्षेत्राला चालना : रोजगार आणि उत्पादन वाढनऊ ठिकाणी गृहप्रकल्पांची आखणी : महापालिकेचा पुढाकार

प्रथमच घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीही योजना केवळ घर देणारी नाही, तर ती अनेकांचे भविष्य उजळवणारी आहे. क्षेत्रफळ, उत्पन्न मर्यादा आणि गुणवत्तेतील सुधारणा यामुळे पिंपरी-चिंचवडमधील हजारो नागरिकांना या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ मिळणार आहे. -  संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.

टॅग्स :PuneपुणेHomeसुंदर गृहनियोजनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड