शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयते हातात घेऊन दशहत; आज तुला संपवतो म्हणून तरुणाला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 19:00 IST

अजंठानगरमध्ये टोळक्याचा राडा

पिंपरी : कोण आहे या बिल्डिंगचा भाई, बाहेर ये. आज तुला संपवतो, असे म्हणून टोळक्याने कोयते हातात घेऊन राडा घातला. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. १४) रात्री साडेआठच्या सुमारास अजंठानगर, निगडी येथे घडली.

निखिल विलास गजरमल (वय २७, रा. अजंठानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष उर्फ व्यंक्या पवार, भैय्या साबळे, आकाश पौळ, सौरभ वाघमारे, राजू तिरकर (सर्व रा. अजंठानगर, निगडी), पवन लष्करे (रा. रामनगर, चिंचवड) आणि सात ते आठ इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी पाणी भरत असताना त्यांच्या परिसरात राहणारे आरोपी फिर्यादी यांना मारहाण करण्याच्या उद्देशाने आरडाओरडा, शिवीगाळ करत कोयते घेऊन आले. त्यावेळी काही नागरिकांनी आरोपींना अडवले असता आरोपींनी नागरिकांना कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींना घाबरून सर्वजण घरांमध्ये पळून गेले असता आरोपींनी फिर्यादीच्या घराच्या दरवाजावर लाथा मारल्या. कोण आहे या बिल्डींगचा भाई, बाहेर ये. आज तुला संपवतो, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड