शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवा; पिंपरी चिंचवड महापालिकेतील बैठक

By विश्वास मोरे | Updated: January 10, 2024 18:19 IST

पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात

पिंपरी : महापालिका भवन येथे शहरातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत आढावा बैठक झाली. त्यात इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर चर्चा झाली. महापालिका प्रशासनाने  गांभीर्याने कार्यवाही करावी. पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात. तसेच, प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशा करण्यात आल्या. 

पिंपरी- चिंचवड शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदूषणबाबत 'लोकमत'ने वृत्त मालिका केली तसेच गेल्या दहा दिवसापासून नदी फेसाळत आहे. याबाबत आवाज उठविला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेतील बैठकीस आमदार महेश लांडगे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजय खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियानात मकरंद निकम, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, श्रीकांत सवणे, रामदास तांबे, मनोज सेठिया आदी उपस्थित होते. 

नदी प्रदूषणाबाबत जिल्हा प्रशासन, एमआयडीसी, नगरपालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ,  महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. नदी प्रदूषणाची कारणे, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, किती नाले नदीला जावून मिळतात? त्यावर प्रशासन काय कार्यवाही करणार आहे? अशा विविध मुद्यांवर प्रशासनाने भूमिका मांडावी, अशीही चर्चा झाली. प्रदूषण नियंत्रण महामंडळास प्रदूषणाबत माहिती द्यावी, अशीही सूचना केली.     आमदार महेश लांडगे म्हणाले, इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी. पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात. तसेच, प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे तातडीने हाती घ्यावीत.  आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषित पाणी नदीमध्ये  न मिसळण्यासाठी तळवडे, चिखली, डुडूळगाव, दिघी, सीएमई हद्दीत भोसरी येथे एकूण ९५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करणे प्रस्तावित आहे. यासह चऱ्होली येथे ४१ एमएलडी, कुदळवाडी येथे ३  एमएलडी काम पूर्ण झाले आहे. रिव्हर रेसिडेन्सी येथील १२ एमएलडी प्रकल्पांचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे.'' त्यावर आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका नदी प्रदूषणाबाबत करीत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली. पावन, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या नदीसुधार आराखड्याची माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाindrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणMLAआमदार