चिंचवड:  पारंपारिक वाद्यांचा दणदणाट , ढोल-ताशांचा गजर , फुलांसह भंडारा व गुलालाची उधळण, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर.... असा जयघोष यांसह सुरु असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पिंपरी येथील विसर्जन मिरवणुकीत उत्साह संचारला. त्यामुळे परंतु पाऊस उघडल्यावर पुन्हा गणेश मंडळे , कार्यकर्ते आणि भक्तांमध्ये उत्साह संचारला. 

 * फ्रान्सवरून विल्यम्सन चिंचवड येथे आले असता गणपती चे आकर्षण त्यांना चिंचवड घाटावर घेऊन आले. तेथे त्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत गणपतीचे विसर्जन केले.

( क्षणचित्रे- अतुल मारवाडी आणि सहकारी ) 

दुपारी बाराच्या सुमारास येथील मिरवणूक सुरू झाली. रात्री आठपर्यंत ३७ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळाच्या स्वागतासाठी शगुन चौकात स्वागतकक्ष उभारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान करून स्वागत केले.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी गणेश विसर्जन मिरवणूक चिंचवडमध्ये असते. दुपारी एक वाजल्यापासून चिंचवडमधील विसर्जन  सुरू झाली आहे चिंचवड गावातील चापेकर चौकामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारलेला आहे. दुपारी एकच्या दरम्यान पहिले गणेश मंडळ चौकात आले.  त्यानंतर चापेकर चौकातून वाल्हेकरवाडी रस्त्याने थेरगाव नदीघाटावर विसर्जन करण्यात आले.

ढोल-ताशाच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या निनादाने उत्साह द्विगुणित झाला. पिंपरी फळ बाजारातील शिवराजे प्रतिष्ठानचा गणपती पावणे आठच्या सुमारास शगुन चौकात दाखल झाला. त्यानी सादर केलेला साई दरबार हा देखावा लक्षवेधक ठरला. शिवराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोमी संधू यांचे महापौर राहुल जाधव यांनी सत्कार करून स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. काही मंडळांनी आतषबाजी केली. काही जणांनी फुगड्यांचा फेर धरत रंगत आणली.

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड गावातील पवना नदी घाटावर विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे.  या ठिकाणी महानगरपालिकेचा अग्निशमन दलाचे पथक आरोग्य वैद्यकीय विभागाचे पथक तैनात केले आहे दुपारी 1ते साडेपाच या वेळेत फक्त एकच मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले आहे. 

ढोल-ताशांच्या निनादात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत पारंपारिक वाद्यांचा दणदणाट करत चिंचवड मधील चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात येत होते .दुपारी 1 ते 3 या वेळेत फारशी मंडळे आली नाहीत.

 

पाऊस उघडल्यानंतर चिंचवड मधील मिरवणुकीत रंग भरू लागला आहे. चिंचवड स्टेशन, तानाजीनागर, भोईरनगर मार्ग मंडळे चिंचवड गावातील चापेकर चौकात येऊन पुढे विसर्जन घाटाकडे मार्गस्थ होत होती. चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारला होता. व्यासपीठावर महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेवक अश्विनी चिंचवडे , मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते. 
पावणेआठपर्यंत मिरवणुकीत केवळ दोन मंडळे सहभागी झाली आहे. चिंचवड गावीतील मंडळाची तयारी पूर्ण झाली आहे. उत्साह वाढू लागला आहे. गणेशभक्ताची गर्दी चौकात होऊ लागली आहे.

Web Title: immersion procession 2019 : rain in Chinchwad immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.