शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'तू घरी चल नाही तर येथेच तुला गोळी घालील'; पतीने पत्नीवर गोळी झाडण्याचा केला प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 19:47 IST

पिस्तुलचा ट्रिगरचा न दबल्याने पत्नीसह तिघांचे प्राण वाचले

चाकण : तू घरी चल नाही तर येथेच तुला गोळी घालील, असे म्हणत पतीने पत्नी आणि सासू- सासर्याला मारण्यासाठी गावठी पिस्तुलातून गोळी झाडत असताना पिस्तुलचा ट्रिगरचा न दबल्याने पत्नीसह तिघांचे प्राण वाचले.ही घटना येथे रविवारी (दि. २९) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारासताच्या निघोजे (ता. खेड ) येथे घडली.हरिष अशोक काकडे (वय,२४, रा. शिवाजीवाडी,मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.याबाबत त्याच्या २१ वर्षीय पत्नीने सोमवारी (दि. ३०) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिलेने आपल्यासोबत मोशी येथे सासरी यावे यासाठी आरोपी निघोजे येथे आला होता. त्याचे पत्नीशी भांडण झाल्यावर तिच्या हातातील मोबाइल त्याने खेचून घेतला. तू घरी चल नाहीतर येथेच तुला गोळी घालेल, अशी धमकी त्याने पत्नीला दिली. त्यानंतर आरोपी हरीष काकडे सासर्याला म्हणाला की मला तुमच्याशी १० मिनिटे बोलायचे आहे,असे म्हणत त्याने कमरेला खोचलेली पिस्तुल बाहेर काढून लोड केली. तुमच्या तिघांना मी जिवंत ठेवत नाही,असे म्हणून पत्नीच्या दिशेने पिस्तुल रोखले.आरोपी काकडे याने ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र गावठी पिस्तुल असल्याने त्याचा ट्रिगर दाबला गेला नाही.पिस्तुल रोखल्याचे लक्षात येताच पत्नीने पतीवर झडप घालून त्याच्या हातातील पिस्तुल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिच्या मदतीला आई वडिलही आले. त्या तिघांनी मिळून हरिष काकडे याच्या हातातून पिस्तुल हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. तुम्ही जर पोलिसात तक्रार दिली तर मी दोन-तीन महिने जेलामध्ये जाईल. मात्र सुटून आल्यावर मी तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी त्याने सासर्याला फोन करून दिली.पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस