पिंपरी: विवाह इच्छुकांची माहिती संकेतस्थळावर देऊन विवाह जुळविण्यास मदत केली जाते. अशा संकेत स्थळावरून ओळख झालेल्या एकाने महिलेस लग्नाचे आमिष दाखवत या महिलेला जवळपास ८० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रजेंद्र मेनॉर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने चिंचवड ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेने भारत मॅट्रिमोनी या संकेतस्थवर विवाहाकरिता नाव नोंदणी केली होती. तिथे तिची ओळख आरोपी मेनॉर याच्याशी झाली. सोशल मिडियाच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात आले. परदेशात डॉक्टर असल्याचे फिर्यादी महिलेला सांगत तिचा विश्वास संपादन केला. तसेच लवकरच भारतात येणार असून आपण प्रत्यक्ष भेटू आणि त्यानंतर लग्न करू असे तिला सांगितले.काही दिवसांनी भारतात आलो असल्याचे त्याने तिला फोनवरून सांगितले. विमानतळावर उतरलो असून कस्टमचा माल सोडवण्यासाठी भारतीय चलन तातडीने आवश्यक आहे. असे सांगितले. तसेच बँक खात्यात रक्कम भरण्यास सांगितली. दोनदा तिने त्याच्या खात्यावर एकूण ७९ हजार ८०० रुपये इतकी रक्कम भरली. नंतर मात्र त्याचा फोन बंद झाला. तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आले.
मॅट्रिमोनी संकेतस्थळावरील ओळख पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 16:41 IST
परदेशात डॉक्टर असल्याचे सांगत भारतात आलो की आपण प्रत्यक्ष भेटू आणि त्यानंतर लग्न करू असे सांगत एका महिलेची ८० हजारांची फसवणूक करण्यात आली.
मॅट्रिमोनी संकेतस्थळावरील ओळख पडली महागात
ठळक मुद्देफिर्यादी महिलेची भारत मॅट्रिमोनी या संकेतस्थवर विवाहाकरिता नाव नोंदणीसोशल मिडियाच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात