शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पैसे नसल्याने आयसीयू नाकारला; जिल्हा रुग्णालयात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू;चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:26 IST

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी : चौकशी समिती नेमली असून दोन दिवसांत अहवाल सादर होणार

पिंपरी : खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या बेडसाठी पैसे नसल्याने संकेत रणजित सूर्यवंशी (वय १८, रा. नवी सांगवी, मूळ रा. लातूर) याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीस त्यास सर्वसाधारण वॉर्ड आणि त्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शनिवारी (दि. ७) सकाळी मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप मुलाची आई रागिणी सूर्यवंशी यांनी केला आहे. तर याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी दिले आहेत.

रागिणी सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेतला नवी सांगवी येथील खासगी रुग्णालयाने ‘आयसीयू’ची गरज असल्याचे सांगितले. मात्र, आयसीयूसाठी पैसे नव्हते. औंध जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास आणले. स्ट्रेचर ढकलण्यास एका वॉर्डबॉयला सांगितले. मात्र, हे आमचे काम नाही, म्हणत मदत करण्यास नकार दिला. तर आपत्कालीन विभागातील डॉक्टारांनी ‘आयसीयू’ची गरज नसल्याचे सांगितले. जनरल वॉर्डात दाखल केले. मात्र, तेथे उपचार केले नाहीत. रात्री दोननंतर त्याची तब्बेत खालावली. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तोंडातून रक्त येत होते. मात्र, आम्हाला शिकवू नका, असे म्हणत तेथील डॉक्टरांनी चालढकल केली. पहाटे चारला त्याला ‘आयसीयू’मध्ये दाखल केले. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.आईवरही उपचार करण्यास कुचराईसंकेतची मोठी बहीण येथे परिचारिकेचे प्रशिक्षण घेत आहे. तर वडील तात्पुरते चालकाचे काम करतात. मुलगा गेल्याने आईला धक्का बसला. त्यामुळे रक्तदाब वाढला. मात्र, त्यांना तपासण्याची व उपचार करण्याची तसदी कर्मचाऱ्यांनी घेतली नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

चौकशी समिती नेमली असून, दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

English
हिंदी सारांश
Web Title : Negligence Alleged: Son Dies After Hospital Delays, Family Claims

Web Summary : Family alleges negligence led to son's death after hospital delayed ICU admission due to payment issues. Internal inquiry initiated after the incident. The family also claims the mother was denied medical attention.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र