शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

'मी आकुर्डीचा भाई, मला फुकट दारू द्या' असे म्हणत दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 16:03 IST

जबरदस्तीने ३२० रुपये किंमतीच्या दोन दारूच्या बाटल्या आरोपी घेऊन गेला

पिंपरी : मी आकुर्डीचा भाई आहे. तुम्ही मला फुकट दारू द्या, असे म्हणत एकाने पैसे न देता दारूच्या दोन बाटल्या घेतल्या. त्यानंतर दुकानदाराला शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जुना पुणे मुंबई महामार्ग, आकुर्डी येथे सोमवारी (दि. १) सकाळी अकराच्या सुमारास स्वरूप वाईन्स या दुकानात ही घटना घडली.

विजय वाघमारे (रा. आकुर्डी), असे  गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आदिनाथ हनुमंत गोरे (वय २५, रा. तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे यांचे आकुर्डी येथे स्वरूप वाइन्स नावाचे दुकान आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास विजय वाघमारे हा गोरे  यांच्या दुकानात आला. मी आकुर्डीचा भाई आहे. तुम्ही मला फुकट दारू द्या, असे म्हणून दुकानातील दोन दारुच्या बाटल्या वाघमारेने घेतल्या. गोरे यांनी विरोध केला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानातील कामगार हा वाद सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर जबरदस्तीने ३२० रुपये किंमतीच्या दोन दारूच्या बाटल्या आरोपी घेऊन गेला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक