प्रेमिकेला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पतीने पत्नीला केली मारहाण; चिंचवड येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:06 PM2020-09-21T13:06:06+5:302020-09-21T13:07:16+5:30

प्रेमिकेला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करून तुझ्याकडे पाहून घेतो अशी दिली धमकी

Husband beats wife over anger due to dismiss girlfriend from work | प्रेमिकेला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पतीने पत्नीला केली मारहाण; चिंचवड येथील घटना

प्रेमिकेला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पतीने पत्नीला केली मारहाण; चिंचवड येथील घटना

Next
ठळक मुद्देविवाहितेने पती, दीर, सासू, सासरा आणि कामगार महिला यांच्या विरोधात नोंदवला गुन्हा

पिंपरी : प्रेमिकेला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पतीने पत्नीला मारहाण केली. तिचा छळ केला. तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. याबाबत विवाहितेने पती, दीर, सासू, सासरा आणि कामगार महिला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना चापेकर चौक, चिंचवडगाव येथे घडली आहे.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पती मिलिंद भिमाजी वडेर, दीर शैलेश भिमाजी वडेर, सासू नीलिमा भिमाजी वडेर, सासरा भिमाजी आत्माराम वडेर (सर्व रा. चाफेकर चौक, चिंचवडगाव), रोहिणी संजय खराटे (रा. निंबाळकर आळी, चिंचवडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
आरोपी रोहिणी फिर्यादी यांच्याकडे काम करत होती. आरोपी पती मिलिंद आणि रोहिणी यांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मिलिंदला रोहिणीसोबत विवाह करायचा होता. मात्र फिर्यादी महिलेने रोहिणीला कामावरून काढून टाकले. या कारणावरून आरोपींनी फिर्यादी विवाहितेचा छळ केला. लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी फिर्यादीला घरगुती कारणांवरून तसेच तू खालच्या जातीची आहे, असे म्हणून सतत शिवीगाळ व मारहाण केली. पती मिलिंद याने माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच रोहिणीला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून तू घर सोडून जा, मला रोहिणीसोबत लग्न करायचे आहे, असे म्हणून मिलिंद याने विवाहितेला त्रास दिला. कामगार महिलेला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करून तुझ्याकडे पाहून घेतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

Web Title: Husband beats wife over anger due to dismiss girlfriend from work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.