शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना सामान्य करात मिळणार १०० टक्के सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 20:31 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ४ हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे...

पिंपरी : कोरोनाच्या महामारीमुळे औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमधील साडेचार हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या  शहरातील मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच मालमत्ता हस्तांतरण नोंद नोटीस फी देखील माफ करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ४ हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मिळकती हस्तांतरण करण्यासाठी महापालिकेच्या मिळकतकर विभागाने मोहीम राबविली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीसमोर आगामी आर्थिक वर्ष २०२२ - २३ मध्ये मालमत्ताकराचे दर जैसे थे ठेवण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. अध्यक्षस्थानी नितीन लांडगे होते. या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.

प्रस्तावास उपसूचनाया प्रस्तावाला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ता धारकांच्या कुटुंबियांना सामान्य करात १०० टक्के सवलत देण्याची उपसूचना देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे म्हणाले, ‘‘सन २०२० - २१ आणि २०२१ - २२ या कालावधीत महापालिका हद्दीमधील ज्या निवासी मालमत्ताकर धारकांचे कोरोना या महामारीने मृत्यू झालेला आहे. त्यांच्या नावावर मालमत्ता आहे. अशा कुटुंबाला दिलासा देण्यासाठी आगामी २०२२ - २३ या आर्थिक वर्षात कराचे व करेत्तर बाबीचे दर निश्चित करताना सवलत द्यावी. या मालमत्तांना चालू वषार्तील मागणीतील देय सामान्य कर रकमेच्या १०० टक्के सवलत द्यावी. तसेच मालमत्ता हस्तांतरण नोंद नोटीस फी मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना माफ करण्यात यावी. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता हस्तांतरण करण्याच्या मोहिमेला मुदतवाढ दिली. ३१ जानेवारी २२ पर्यंत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याला उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड