महिलेला मिठी मारल्याने चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 05:04 IST2018-05-25T05:04:40+5:302018-05-25T05:04:40+5:30

सकाळी दहाच्या सुमारास २९ वर्षीय महिला रस्त्यालगत थांबली असता, अचानक मागून येऊन माथेफिरूने तिला मिठी मारली.

Hug the woman after hugging her | महिलेला मिठी मारल्याने चोप

महिलेला मिठी मारल्याने चोप

पिंपरी : आकुर्डी येथे पाठीमागून येऊन अचानक महिलेला मिठी मारणाऱ्या माथेफिरूस नागरिकांनी चोप दिला. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. चोप देऊन नागरिकांनी माथेफिरूस निगडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर भीमराव प्रमाणे (वय ४२, रा. वाल्हेकरवाडी) असे या मनोविकृताचे नाव आहे. सकाळी दहाच्या सुमारास २९ वर्षीय महिला रस्त्यालगत थांबली असता, अचानक मागून येऊन माथेफिरूने तिला मिठी मारली. अचानक घडलेल्या या प्रकराने महिला घाबरली. आरडाओरडा करताच नागरिक जमा झाले.
घडला प्रकार समजताच, नागरिकांनी माथेफिरूला चोप दिला. निगडी पोलिसांना कळवून त्यांनी आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले. निगडी पोलीस आरोपीला घेऊन गेले. मनोविकृत असल्यामुळे त्याने हे कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Hug the woman after hugging her