शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

कसा रोखणार कौटुंबिक हिंसाचार? दिवसाआड होतोय गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Updated: June 6, 2025 14:04 IST

-पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत पाच महिन्यांत ८० गुन्ह्यांची नोंद

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर कौटुंबिक हिंसाचार आणि विवाहित महिलांच्या छळाबाबत चर्चा होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत पाच महिन्यांत कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी ८० गुन्हे दाखल करण्यात आले. दिवसाआड एक गुन्हा दाखल होत असल्याचे यावरून दिसून येते. शिक्षित आणि अल्पशिक्षित, तसेच स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या विवाहितांना छळाला सामोरे जावे लागत असल्याचे अनेक प्रकरणांवरून दिसून येते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, कौटुंबिक हिंसाचार कधी थांबणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

महिलांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविला असला, तरी त्यांना घरात तसेच सामाजिक जीवनात छळाला सामोरे जावे लागते. यात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी विवाहित महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा अस्तित्वात आहे. सासरी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळापासून महिलांचे या कायद्याअंतर्गत संरक्षण केले जाते. मात्र, असे असले तरी त्रास असह्य झाल्यानंतरच अनेक महिला तक्रार करण्यासाठी पुढे येतात. तोपर्यंत अनेक प्रकरणांमध्ये उशीर झालेला असतो. त्यामुळे वेळीच तक्रार करणे किंवा वाचा फोडणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

विवाहपूर्व आणि विवाहपश्चात समुपदेशनलग्न जुळवताना संबंधित वधू आणि वर, तसेच दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. त्यात विवाहपूर्व समुपदेशन देखील करता येते. तसेच विवाहपश्चात समुपदेशन देखील करावे. जेणेकरून वाद मिटवण्यास मदत होऊ शकते.

सामाजिक जाणीव महत्त्वाचीमोबाइल फोनमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मात्र, त्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतला जात नाही. केवळ मनोरंजन म्हणून मोबाइलचा वापर करण्यावर भर असतो. परिणामी मोबाइलमुळे वैवाहिक आयुष्यात वाद होतात. संशयातून गैरसमज आणि त्यातून भांडण होण्याचे प्रकार घडतात. त्यासाठी सामाजिक जाणीव असली पाहिजे. त्यात व्यावहारिक, तसेच सामान्य ज्ञान वाढले पाहिजे. त्यामुळे कोणत्या प्रसंगाला कसे सामोरे जावे, कुठे कसे वागावे, काय बोलावे यासह समयसूचकता असावी. यातून निर्णय क्षमता वाढीस लागून आपल्या स्वत:साठी योग्य आणि अयोग्य याबाबत जाणून घेणे शक्य होते. त्यासाठी तरुणांचा सामाजिक बुद्ध्यांक वाढला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

हुंडाबळीचे तीन गुन्हेपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत चिंचवड, बावधन आणि महाळुंगे एमआयडीसी या पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण तीन गुन्हे यंदा दाखल झाले आहेत. विवाहित महिलेने तिच्या माहेरच्यांकडून पैसे, दागिने किंवा वाहन आणावे, अशी मागणी सासरच्यांकडून केली जाते. त्यासाठी छळ केला जातो. या छळाला कंटाळून महिला आत्महत्या करते. अशा घटनांमध्ये हुंडाबळीप्रकरणी गुन्हा दाखल केला जातो.

लग्न करताना केवळ प्रतिष्ठा बघू नये. यातून दोन्ही कुटुंबांचे मनोमिलन झाले पाहिजे. सासरच्यांकडून अवास्तव मागण्या होत असल्यास वेळीच विरोध केला पाहिजे. नवदाम्पत्यांच्या संसारात नातेवाइकांनी हस्तक्षेप टाळावा. - सुलोचना भोवरे, उपाध्यक्ष, विदर्भ मित्रमंडळसासरच्यांकडून होणारा छळ असह्य झाल्यानंतरच विवाहित महिला किंवा तिच्या माहेरचे तक्रार करण्यासाठी पुढे येतात. असे न करता माहेरच्यांनी आणि सासरच्यांनीही वेळीच दखल घ्यावी. त्याबाबत समुपदेशन घ्यावे. कौटुंबिक हिंसाचार ही केवळ एका कुटुंबाची समस्या नाही तर सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे आले पाहिजे. - प्रकाश जुकंटवार, सामाजिक कार्यकर्ता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला