शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लांबून येणारी बस ओळखणार कशी? पीएमपीच्या ‘डिजिटल’ प्रवासाचा फज्जा; अनेक बसवरील डिजिटल बोर्ड ‘ब्लॅक आऊट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 13:45 IST

तांत्रिक अडचणीमुळे केवळ एक-दोन बसेसचे बोर्ड बंद असू शकतात, पीएमपी प्रशासनाची प्रतिक्रिया; ज्येष्ठ नागरिक आणि परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे हाल

- आकाश  झगडेपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची ‘स्मार्ट’ म्हणून ओळख होत असताना, सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी बसेसचा कारभार मात्र उलट्या दिशेने सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक बसेसवरील डिजिटल मार्गदर्शक बोर्ड सध्या बंद अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांना बसचा मार्ग आणि क्रमांक ओळखणे कठीण झाले आहे. बोर्ड बंद असलेल्या बसेसची संख्या अधिक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. तांत्रिक अडचणीमुळे केवळ एक-दोन बसेसचे बोर्ड बंद असू शकतात, अशी प्रतिक्रिया पीएमपी प्रशासनाकडून मिळाली.

लांबून बस ओळखणे अशक्य

बसच्या पुढच्या, मागच्या आणि एका बाजूला असलेले हे डिजिटल बोर्ड प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या बोर्डवर नारंगी रंगाच्या मोठ्या अक्षरांत बसचा मार्ग आणि क्रमांक झळकतो. ज्यामुळे प्रवाशांना तो लांबूनच स्पष्ट दिसतो. बोर्ड बंद असल्याने प्रवाशांना बस जवळ आल्याशिवाय ती नेमकी कुठे जाणार आहे, हे कळत नाही. यामुळे अनेकदा बस सुटते किंवा चुकीच्या बसमध्ये चढण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल होत आहेत.

पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधला असता, तांत्रिक बिघाडामुळे केवळ एक दोन बसेसमधील बोर्ड बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रमुख बसस्थानकांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक बसेसचे बोर्ड पूर्णपणे बंद होते. यात छोट्या इंद्रधनुष्य बसमध्ये हे बोर्ड बंद असण्याचे प्रमाण जास्त होते. नवीन इलेक्ट्रिक एसी बसचे डिजिटल मार्गदर्शक बोर्ड सुरू असल्याचे आढळून आले.

बस स्टॉपवर उभे असताना लांबून बोर्ड दिसला की तयारी करता येते. आता बस अगदी जवळ आल्यावर नंबर शोधावा लागतो. प्रशासनाला हे साधे बोर्ड दुरुस्त करता येत नाहीत का? - रवींद्र आंबेकर, ज्येष्ठ नागरिक

रात्रीच्या वेळी किंवा पावसात बसचे नंबर लांबून अजिबात दिसत नाहीत. डिजिटल बोर्डचा मुख्य फायदा हाच असतो की ते अंधारातही स्पष्ट दिसतात. काही बोर्ड बंद असल्याने बस जवळ आल्यावर धावत जाऊन कंडक्टरला विचारावे लागते, यात अनेकदा बस सुटून जाते.- अंकिता साळुंखे, बस प्रवासी

तांत्रिक अडचणीमुळे एक-दोन बसमधील आयटीएमएस प्रणाली बंद असू शकते.- किशोर चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

English
हिंदी सारांश
Web Title : PMPML bus digital boards failing, causing passenger inconvenience and confusion.

Web Summary : Many PMPML bus digital boards are non-functional, making it difficult for passengers to identify bus routes, especially for seniors and those new to the city. The administration claims only a few buses are affected, but on-site inspections reveal widespread issues.
टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलdigitalडिजिटलpassengerप्रवासीSenior Citizenज्येष्ठ नागरिकWomenमहिलाticketतिकिट