शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी प्रकरण : ‘त्या’ कंपनीची पोलिसांकडून तपासणी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:09 IST

व्योमा ग्राफिक्स कंपनीने रात्रीत संकेतस्थळ (वेबसाइट) बंद केले असून कर्मचाऱ्यांचे मोबाईलही बंद

वाकड : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क येथील फेज १ मध्ये मिनी बसच्या आगप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी व्योमा ग्राफिक्स कंपनीची तपासणी केली. कंपनीचे मालक नितेश शहा यांना घेऊन परिसराची संपूर्ण पाहणी केली. मुद्रण विभाग, रसायने ठेवण्याची जागा तसेच बाहेरील परिसराच्या नोंदी केल्या. दरम्यान, व्योमा ग्राफिक्स कंपनीने रात्रीत संकेतस्थळ (वेबसाइट) बंद केले असून कर्मचाऱ्यांचे मोबाईलही बंद आहेत.हिंजवडीतील व्योमा ग्राफिक्स कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून बुधवारी चौघांचा बळी गेला होता. दिवाळीचा बोनस व पगार कापल्याच्या आणि मजुरांचे काम सांगितल्याच्या रागातून, सहकारी कर्मचाऱ्यांशी असलेल्या वादातून जनार्दन हंबर्डीकर या बसचालकानेच बस पेटवून चार कर्मचाऱ्यांना संपविल्याचे स्पष्ट झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी पावणेतीन ते तीनच्या दरम्यान पोलिसांचे पथक कंपनीमध्ये दाखल झाले. पथकाने मुद्रण विभाग, रसायने ठेवण्याची जागा तसेच बाहेरील परिसराची तपासणी केली. यावेळी कंपनीचे मालक नितेश शहा यांच्याकडून पथकाने सर्व माहिती घेतली.पोलिस पथक आल्याचे समजताच आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारावर येऊन, खिडकीतून डोकावत होते. पोलिसांनी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या आत कोणालाही येण्यास मनाई केली होती; परंतु रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या बघ्यांमधून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ही घटना अपघात नसून घातपात असल्याचे सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा उलगडा होताच अनेकांना धक्का बसला. गुरुवारी रात्रीच कंपनीने आपले संकेतस्थळ (वेबसाईट) बंद केले आहे. तसेच या दुर्घटनेतील जखमींसह इतर सर्वच कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक बंद केले आहेत. कंपनीचे संकेतस्थळ आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद ठेवण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.पगार थकवला नसल्याचा कंपनी मालकाचा खुलासाबसचालक जनार्दन हंबर्डीकर याने सीटखाली कंपनीतील बेंझिन आणि कापडाचे बोळे ठेवून बस पेटवली होती. सहकारी कर्मचाऱ्यांशी असलेला वाद व मालकाने पगार कापल्याच्या आणि बोनस थकवल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्याने पोलिस जबाबात सांगितले होते. याबाबत मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी नितेश शहा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कंपनीकडून बसचालकाचे कोणतेच पैसे बाकी ठेवलेले नाहीत. सर्व पैसे दिले आहेत. आम्ही पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत आहोत. बसचालकाने कंपनीतील बेंझिनचा वापर केल्याबाबत मात्र काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रArrestअटकPoliceपोलिस