शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बुकिंगसाठी आईसोबत निघालेल्या मुलीचा मिक्सर ट्रकखाली चिरडून मृत्यू; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:21 IST

आईच्या डोळ्यासमोर झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिंपरी -हिंजवडी परिसरात एक हृदयद्रावक अपघात घडला. गणपतीचे बुकिंग करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या ११ वर्षांच्या मुलीला सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकने चिरडले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.अधिकच्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव प्रत्युषा संतोष बोराटे (वय ११) असे असून ती आपल्या आईसोबत गणपतीचे बुकिंग करण्यासाठी जात होती. यावेळी मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर प्रत्युषा रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली. आईच्या डोळ्यासमोर झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मिक्सर ट्रक चालक फरहान मुन्नू शेख, ट्रक मालक प्रदीप मारुती साठे आणि सुपरवायझर प्रसाद मंडलिक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.दरम्यान, प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीचा खून बिल्डर आणि त्याच्या ट्रक चालकामुळे झाला. त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. कठोर कारवाई न झाल्यास आम्हाला न्याय मिळणार नाही. नसेल जमले तर माझाही जीव घ्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया मृत मुलीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.  हिंजवडी व आसपासच्या आयटी नगरीत गेल्या काही वर्षांपासून अवजड वाहनांमुळे अनेक अपघात घडले असून, अनेकांनी प्राण गमावले आहेत. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी अशा वाहनांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. हिंजवडी परिसरात बेदरकारपणे धावणाऱ्या अवजड वाहनांवर आता कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhinjawadiहिंजवडीAccidentअपघात