शहरातील दिग्गजांवर पराभवाची नामुष्की

By Admin | Updated: February 24, 2017 02:59 IST2017-02-24T02:59:18+5:302017-02-24T02:59:18+5:30

सलग सहा वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले माजी महापौर आर एस कुमार

The hero of the city | शहरातील दिग्गजांवर पराभवाची नामुष्की

शहरातील दिग्गजांवर पराभवाची नामुष्की

पिंपरी : सलग सहा वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले माजी महापौर आर एस कुमार यांना नव्याने राजकारणात आलेल्या शिवसेनेच्या अमित गावडे यांच्याकडून या निवडणुकीत पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. त्यांच्यासह विविध पक्षांत महत्त्वाची पदे भूषविलेल्या आणि सलग तीन ते चार टर्म नगरसेवक राहिलेल्या दिग्गजांना महापालिकेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या पराभवाचा हा निकाल धक्कादायक मानला जात आहे.
पराभवाला सामोरे जावे लागलेल्यांमध्ये विद्यमान महापौर शकुंतला धराडे, शिवसनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर,माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, विलास नांदगुडे, नारायण बहिरवाडे, शमीम पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक मारूती भापकर, मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, विद्यमान नगरसेवक उल्हास शेट्टी, कैलास थोपटे, अनिता तापकीर, धनंजय आल्हाट, विद्यमान नगरसेविका शारदा बाबर, भारती फरांदे, शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर अशा दिग्गजांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The hero of the city