शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो इनस्पेक्टर : मोबाइल ऑन केल्याने लोकेशन ट्रेस झाले अन् संशयिताला दारुच्या दुकानात गाठले

By नारायण बडगुजर | Updated: June 7, 2025 17:39 IST

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथील जगतापनगरमध्ये ११ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी सातच्या सुमारास एका रिक्षात विधवा महिला असल्याचे दिसून आले.

पिंपरी : ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या विधवेचा घरासमोर मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला. यात रिक्षाच्या क्रमांकावरून क्ल्यू मिळाला अन् पुणे स्टेशन ते कर्नाटक आणि तेथून पुन्हा सोलापूरपर्यंत संशयिताचा पाठलाग केला. दरम्यान, संशयिताच्या पहिल्या पत्नीने एका मिनिटासाठी तिचा मोबाइल फोन ऑन केल्याने पोलिसांना ‘लोकेशन’ मिळाले अन् त्यांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या.    

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथील जगतापनगरमध्ये ११ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी सातच्या सुमारास एका रिक्षात विधवा महिला असल्याचे दिसून आले. ती झोपली असल्याचे समजून काही जणांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित २७ वर्षीय महिलेच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले असून तिला पाच वर्षांचा मुलगा असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. 

संबंधित महिलेला घरासमोर रिक्षातून कोणी आणले, याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यात रिक्षामालकाचा शोध घेऊन चौकशी केली असता काळेवाडी येथील एका ३५ वर्षीय चालकाला भाडेतत्त्वावर रिक्षा चालवण्यासाठी दिल्याचे समोर आली. त्यामुळे संबंधित चालकाचा पोलिसांना शोध घेतला. रिक्षाचालक आणि विधवा महिला हे ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याचे समजले. तसेच रिक्षाचालकाची पहिली पत्नी त्याला सोडून मुंबई येथे राहत असून त्यांच्या मुलाचे लग्न झाल्याचेही समोर आले. 

रिक्षाचालक हा काळेवाडी परिसरात प्रवासी वाहतूक करतो. प्रवासी वाहतूक करताना २७ वर्षीय महिलेची आणि त्याची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने ते ‘लिव्ह इन’मध्ये राहात होते. दोघांनाही दारुचे व्यसन होते. दरम्यान, रिक्षाचालक विधवा महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. नेहमीप्रमाणे ते दारू पित असताना संशयावरूनच त्यांच्यात भांडण झाले. यात रिक्षाचालकाने तिचा गळा आवळला. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रिक्षात मृतदेह ठेवून तिच्या आईवडिलांच्या घराच्या परिसरात मृतदेह असलेली रिक्षा सोडून रिक्षाचालक फरार झाला.  

असा घेतला शोध

रिक्षाचालकावर संशय आल्याने वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. यात रिक्षाचालक पुणे स्टेशन येथे असल्याचे समोर आले. पथकाने पुणे स्टेशन गाठले. तसेच रिक्षाचालकाच्या मुंबईतील पहिल्या पत्नीचेही मोबाइल लोकेशन ट्रेस केले. त्यावेळी ती पुण्याकडे येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ते दोघेही कर्नाटककडे जात असल्याचे तांत्रिक विश्लेषणातून स्पष्ट झाले. तपास पथकानेही कर्नाटक गाठले. पहिल्या पत्नीचे मुळगाव कर्नाटक असून, तिच्या नातेवाईकांकडे ते गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी ते दोघेही तेथून निघून गेल्याचे समजले. दोघेही पुन्हा महाराष्ट्रात गेल्याचे समजले. 

सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात शोध

पोलिस पथक सोलापूर रेल्वे स्टेशनवर आले. त्यावेळी संशयिताच्या पहिल्या पत्नीच्या फोनचे लोकेशन एका मिनिटासाठी ऑन झाले. त्यामुळे पथकाने सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता दारुच्या एका दुकानात संशयित दिसून आला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली.     

संशयित रिक्षाचालकाने पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याचा मोबाइल फोन बंद ठेवला होता. मात्र, त्याच्या पहिल्या पत्नीने एका मिनिटासाठी फोन सुरू केला आणि ते दोघेही ‘ट्रेस’ झाले. त्यासाठी पुणे स्टेशन ते कर्नाटक आणि तेथून पुन्हा सोलापूरपर्यंत त्यांचा पाठलाग केला.  -निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी