शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी परिसरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, वीजपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 19:52 IST

शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, ताथवडे, पुनावळे या भागात पावसाची हजेरी

ठळक मुद्देअचानक आलेल्या पावसामुळे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची धांदल

पिंपरी : महापालिकेसह मुळशी आणि मावळच्या काही भागात शनिवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहर लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. नागरिकांनी घरीच बसून पावसाचा आनंद घेतला. तर वादळी पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड शहर लॉकडाऊन केले आहे. संचारबंदीमुळे शहरातील दळणवळण ठप्प झाले आहे. दुध, किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्यक सेवा वगळता पूर्णपणे शहर बंद आहे.आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. सकाळी अकरानंतर आकाशात ढग यायला सुरूवात केली. सायंकाळी चारनंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला. सायंकाळी सहाला हलक्या पावसाच्या सरी यायला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट सुरू झाला. साडेसहा ते पावणे सात या कालखंडात जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, मोशी, चिखली, वाल्हेकरवाडी, थेरगाव, किवळे, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, वाकड, ताथवडे, पुनावळे या भागात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या  पावसामुळे पिंपरीतील काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे कोरोनामुळे घरीच असणाऱ्या नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. 

रस्ते ओस....कोरोनामुळे शहरातील रस्ते ओस पडले आहेत. सायंकाळी नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्यास घराबाहेर पडत असतात. मात्र, पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. अचानक आलेल्या पावसामुळे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची धांदल उडाल्याचे दिसून आले. चौकाचौकात तपासणीसाठी असणारे कर्मचारी आडोशाला उभे असल्याचे दिसून आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसPoliceपोलिस