भांडणाच्या रागातून त्यानं जाळल्या दुचाकी

By Admin | Updated: June 22, 2017 14:25 IST2017-06-22T14:24:37+5:302017-06-22T14:25:24+5:30

नवी सांगवी येथील गणेश नगर परिसरातील श्रीकल्प इमारतीच्या वाहनतळावरील ४ दुचाकी जाळण्यात आल्या आहेत

He was burned by the rage of a gun | भांडणाच्या रागातून त्यानं जाळल्या दुचाकी

भांडणाच्या रागातून त्यानं जाळल्या दुचाकी

>ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 22 - क्षुल्लक वादातून नवी सांगवी येथील गणेश नगर परिसरातील श्रीकल्प इमारतीच्या वाहनतळावरील  ४ दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. बुधवारी ही घटना घडली. ओंकार जालिंदर आधाटे (वय 23) असे आरोपीचे नाव असून सांगवी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ओंकार आणि फिर्यादी प्रवीण मधुकर रणवरे (वय २७) यांच्यात दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. भांडणाचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादीची दुचाकी जाळली. 
 
मात्र, या घटनेत दुचाकी शेजारी असलेल्या वाहनांचं नुकसान झाले आहे. एकूण चार वाहने जळून खाक झाली. या वेळी दुचाकीच्या इंधन टाकीचा स्फोट झाला. मोठा आवाज होताच, आजुबाजूचे रहिवाशी जागे झाले. 
 
याची माहिती तातडीनं त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन  इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सांगवी पोलास ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: He was burned by the rage of a gun