शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘त्याने ’ ह्दय शस्त्रक्रियेसाठी केली सव्वा लाखांची चोरी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 19:49 IST

कुणी मैत्रिणीचे हट्ट पुरवण्यासाठी तर कुणी स्वतःच्या ऐश आरामासाठी चोरी करण्याचे प्रकार नेहमी घडतात. पण.. हृदय

पिंपरी : ह्दयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एकाने दुचाकीची डिक्की फोडून एक लाख २२ हजार रुपयांची चोरी केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अनिल सॅमियल गायकवाड (वय ५४, रा. पाटील चौक, दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमोल प्रकाश रावळ (वय ३६, रा. रिव्हर रेसिडेन्सी, फेज नं.२, देहू-आळंदी रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल ७ मार्चला सायंकाळी पावणेसात वाजता चिंचवड स्टेशन येथे आले होते. दरम्यान, ते चिंचवड स्टेशन येथील प्रदीप स्वीटससमोर दुचाकी उभी करुन खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेले असता आरोपीने दुचाकीची डिक्की उघडून डिक्कीमधील दोन सोन्याच्या बांगड्या, एक मोबाईल असा १ लाख २२ हजार ७९६ रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.     त्यानंतर पिंपरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपी अनिल हा चोरी करताना आढळून आला. या घटनेची अधिक माहिती घेतली असता मूळचा दौंड येथील असलेला आरोपी सध्या थेरगाव, पडवलनगर येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी राहण्यास आल्याचे समोर आले. त्यानंतर १५ मार्चला त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आपण ह्दयाच्या उपचारासाठी दौंडहून पुण्याला आल्याचे आरोपीने सांगितले. तसेच उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याने चोरी केल्याचीही कबुली दिली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी त्याला अटक करुन १ लाख २२ हजार ५९६ रुपयांचा ऐवज जप्त केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोरHeart Diseaseहृदयरोग