डोक्यात पाईप मारून सोनसाखळी चोरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 21:07 IST2019-09-19T21:06:57+5:302019-09-19T21:07:59+5:30
‘तू माझ्या अंगावर पाणी उडवलेस काय’ असे म्हणत त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकचा पाइप मारून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून चोरट्यांनी पोबारा केला.

डोक्यात पाईप मारून सोनसाखळी चोरली
पिंपरी : फिर्यादी त्यांच्या चारचाकी वाहनामधून जात असताना आरोपीने दुचाकीवरून येत त्यांना अडवले. डोक्यात मारून गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील सांगरीया मेगापोलीस सोसायटी गेटसमोरील रस्त्यावर घडली.
याप्रकरणी विक्रांत विनायक नलावडे (वय ४०, हिंजवडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अक्षय गणेश कंधारे (वय २३) निखिल गणेश कंधारे (वय २१, दोघे रा. चांदे लवळे, ता. मुळशी) यांना पोलिसांंनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रांत हे त्यांच्या चारचाकी वाहनामधून (एमएच ४६ ए पी ९०७७) त्यांच्या घराकडे जात होते. दोघा आरोपींनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत अडवले. त्यानंतर ‘तू माझ्या अंगावर पाणी उडवलेस काय’ असे म्हणत त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकचा पाइप मारून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. दोनही आरोपींना अटक केली असून हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.