शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 15:25 IST

भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा घणाघात...

- प्रकाश गायकर

पिंपरी : दोन दिवसांपूर्वी पेंग्विन सेनेचे नेते आले होते. त्यांनी सांगितलं वेदांता भाजपामुळेगुजरातला गेली. मात्र हे पाप महाविकास आघाडी सरकारने केले नसते तर तुमच्या-आमच्या पोरांना वणवण फिरावे लागले नसते. अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे मोजून पाच वेळा मंत्रालयात गेले, कसे आपल्याकडे प्रकल्प येतील. कंपनीचे लोक सांगत होते की, आम्हाला महाराष्ट्रात कंपनी टाकायची आहे. त्यावेळी हे वसुली बहाद्दर आम्हाला किती देणार असे बोलत होते. त्यांच्या या पापामुळे वेदांता बाहेर गेली असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी सोमवारी (दि. 26) केला.

मावळ तालुक्यात नियोजित असलेल्या वेदांता फॉक्सकॉन कंपनीचे गुजरातमध्ये स्थलांतर झाले. याला जबाबदार महाविकास आघाडी सरकार असून तत्कालीन आघाडी सरकारने जनतेची दिशाभूल केली असल्याचे भाजप युतीकडून सांगितले जात आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या विरोधात मावळ भाजपा, शिंदे गट व आरपीआय यांच्यावतीने सोमवारी (दि. 26) वडगावमधील पोटोबा मंदिर ते पंचायत समिती या दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर वडगाव पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी मार्गदर्शन करताना राम कदम बोलत होते.

कदम म्हणाले, कंपनी सांगत होती आम्हाला राज्यात तळेगावमध्ये प्रकल्प सुरू करायचा आहे. मात्र मुख्यमंत्री तोंडावरील मास्क काढायला तयार नव्हते. मविआमधील लोक खोटं सांगत आहेत. जर कंपनी आली होती तर करार दाखवा, भूसंपादन झाले होते तर सर्व्हे नंबर सांगा. आम्ही यापुढे राज्याच्या गावागावात जाऊन खरे सांगू की कंपनी कोणामुळे बाहेर गेली. आदित्य ठाकरे यांच्यामध्ये थोडी नैतिकता शिल्लक असेल तर खोटं बोलल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेची जाहीर माफी मागावी असेही राम कदम म्हणाले.मविआ दळभद्री सरकार होतंजगाच्या इतिहासामध्ये एकमेव घटना अशी आहे जिथे मंत्री सोडून गेले. तीन पक्षांचे जे सरकार होते ते खऱ्या अर्थाने फुटक्या पायाचे होते. त्याचबरोबर मविआचे सरकार हे दळभद्री सरकार होतं. सत्तेत आल्यापासून सगळे बंद अशी अवस्था होती. मंदिरे बंद आणि दारूचे दुकाने सुरू होती. मात्र राज्यात एका विचाराचे आमदार, खासदार एकत्र आले. एका विचाराचे शिंदे-फडणवीस सरकार आले आणि सर्व सण उत्सव सुरू झाले असे राम कदम म्हणाले.एक कोटी रुपयांचे बक्षीस जिंकामविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे दहा मिनिटेसुद्धा घराबाहेर पडत नव्हते. ते मंत्रालयात देखील मोजून पाच वेळा गेले, सहाव्या वेळेस गेले असतील तर दाखवा आणि एक कोटी रुपये जिंका अशी ऑफर आमदार राम कदम यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Ram Kadamराम कदमBJPभाजपाShiv SenaशिवसेनाFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलGujaratगुजरातMahavikas Aghadiमहाविकास आघाडी