साडेपाच लाखांचे दागिने हिसकावले

By Admin | Updated: June 10, 2017 02:04 IST2017-06-10T02:04:08+5:302017-06-10T02:04:08+5:30

वटपौर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणत वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सौभाग्याच्या

Half of the five-and-a-half lakhs of jewels grabbed ornaments | साडेपाच लाखांचे दागिने हिसकावले

साडेपाच लाखांचे दागिने हिसकावले

लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव : वटपौर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणत वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सौभाग्याच्या लेण्यासह सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे १९ तोळे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना येथे गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी येथील बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या समोरील वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी रेश्मा संतोष चोपडे (रा. ओंकार हौसिंग सोसायटी, देहूगाव) या गेल्या असता, काळ्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी रेश्मा यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले. यामध्ये रेश्मा यांचे पाच लाख ७० हजार रुपये किमतीचे १९ तोळ्यांचे दागिने चोरीला गेले आहे. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

Web Title: Half of the five-and-a-half lakhs of jewels grabbed ornaments