शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

स्मार्ट सिटीमध्ये ‘गुंडाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:14 IST

कृष्णानगर : तोडफोडीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा दहशतीखाली

तळवडे : कृष्णानगर प्रभागात टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रकार घडला आहे़ यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकाराला वेळीच प्रतिबंध करण्याची आवश्यकता असल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे. पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून वेळीच या घटनांना पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.स्मार्ट सिटीच्या प्रांगणात गुंडाराजची झलक पाहावयास मिळत आहे.

पिंपरी, चिंचवड शहरातील सर्व सोयी सुविधांनीयुक्त असणारा व शांतताप्रिय नागरिकांचा वास असणारे उपनगर म्हणजे चिखली प्राधिकरणाची ओळख आहे़ मात्र याच परिसरात माथाडी नेता प्रकाश चव्हाण आणि इयत्ता १० वीमध्ये शिकणारा विद्यार्थी वेदांत भोसले यांच्या खुनाच्या घटना घडल्यामुळे परिसर हादरून गेला होता. दमदाटी करणे, टोळक्याने हातात घातक शस्त्र घेऊन तोडफोड करण्याच्या घटना तर नियमितपणे घडत असून, येथील समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चौकाचौकांत, क्लासेस व शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओ बसलेले दिसतात. या भागात नवीन राहण्यास आलेला बहुतांशी वर्ग कामगार, भाजीपाला विक्री, टेम्पोचालक व इतर लहान व्यावसायिक आहेत. बहुतेकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. यामुळे गुन्हेगारांचे फावत असून, वेळीच अशा गुन्हेगारांवर पोलिसांनी जरब बसविण्याची गरज आहे. सध्या शहरात फ्लेक्स दादा ही संकल्पना चांगलीच रूजली आहे. ज्यांना कोणीही ओळखत नाही त्यांच्याकडे कोणते पद नाही, अशा एखाद्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लावलेल्या फ्लेक्सवर राजकीय नेते, पुढाऱ्यांचे फोटो शुभेच्छुक म्हणून छापले जातात़ बहुतेक याची कल्पनाही राजकीय पदाधिकाºयांना नसते, याचाच गैरफायदा असे फ्लेक्स दादा घेतात़ आपल्या पाठीमागे मोठ्या पदाधिकाºयांच्या हात असल्याचा गवगवा करून गैरफायदा घेत दादागिरी सुरू होते.

या प्रकाराला रोखण्याची गरज असून, उठ सूठ लाव फ्लेक्स या मानसिकतेचे हे दुष्परिणाम आहेत. राजकीय पुढारी व पदाधिकारी यांनीही आपला फोटो वापरण्याची परवानगी देताना संबंधित व्यक्तीचे समाजातील स्थान व वर्तवणूक यांचा सारासार विचार केल्यास होणाºया गैरप्रकाराला आळा घालता येईल.

पोलिसांच्या गस्तीची गरजपरिसरातील उद्यानांमध्ये सायंकाळच्या सुमारास मद्यपी, गर्दुल्ले यांचे टोळके बसलेले असते, यामुळे महिला सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी उद्यानात फिरणे अवघड होत आहे. शाळा व कॉलेजच्या परिसरात सकाळी आणि रोडरोमिओंचा उच्छाद वाढत आहे.हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी उद्यान परिसरात गस्त घालावी, नशापान करणाºयांना उद्यानात मज्जाव करावा. सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात शाळा महाविद्यालय परिसरात पोलिसांचा खडा पहारा असावा, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी ज्या बस मार्गाचा अवलंब करतात त्या ठिकाणी फिरते पथक असावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पुन्हा एकदा तोडफोड सत्र४नुकतीच या परिसरातील महात्मा फुलेनगर येथे तरुणांनी गाड्यांच्या काचा फोडल्या, बुलेट दुचाकीचा आरसा काढून नेला, पाणीपुरीच्या गाडीची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रकार घडला आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने या भागातही गुन्ह्याचे लोण पसरत आहे़ गुन्हेगार निर्ढावलेले असून, गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आहेत़ मात्र याची तक्रार करण्यास सहसा पोलिसांकडे जाण्यास धजावत नाहीत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड