अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्यांसाठी शनिवारी मार्गदर्शन

By Admin | Updated: April 27, 2017 04:57 IST2017-04-27T04:57:25+5:302017-04-27T04:57:25+5:30

अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत’ आणि ‘सप्तर्षी क्लासेस’तर्फे येत्या शनिवारी (२९ एप्रिल) मार्गदर्शन कार्यशाळा

Guidance on Saturday for 11th Science Entrants | अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्यांसाठी शनिवारी मार्गदर्शन

अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्यांसाठी शनिवारी मार्गदर्शन

पुणे : अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत’ आणि ‘सप्तर्षी क्लासेस’तर्फे येत्या शनिवारी (२९ एप्रिल) मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. दहावीनंतर नेमकी वाटचाल कशी करावी, याबाबत बहुतेक विद्यार्थ्यांसह पालकांच्याही मनात संभ्रम असतो. बारावीनंतर अनेकांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असतो, खएए /ठएएळ/ टऌळ-उएळ या परीक्षेतील बारकाव्यांविषयी मार्गदर्शन अपेक्षित असते. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत करिअरतज्ज्ञ विवेक वेलणकर व संचालक अमित नवले मार्गदर्शन करणार आहेत. संस्कृती लॉन्स, साई चौक, नवी सांगवी येथे शनिवारी २९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सिझन ग्रुप
सोशल वेल्फेअर ट्रस्ट, सांगवी हे
या कार्यक्रमाचे स्थळ प्रायोजक आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Guidance on Saturday for 11th Science Entrants