मोटारीची काच फोडल्यामुळे सांगवीत दोन गटांत मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 02:46 IST2019-01-11T02:46:30+5:302019-01-11T02:46:46+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लक्ष्मण धोत्रे (वय ३२, रा. गणेशनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

In the group of two groups, the fight is to break the car's glass | मोटारीची काच फोडल्यामुळे सांगवीत दोन गटांत मारामारी

मोटारीची काच फोडल्यामुळे सांगवीत दोन गटांत मारामारी

पिंपरी : मोटारीची काच फोडल्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत चारजण जखमी झाले. दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल केली असून, ११ जणांविरुद्ध सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहा आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लक्ष्मण धोत्रे (वय ३२, रा. गणेशनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रोहित जाधव, जनार्दन जाधव, योगेश बनपट्टे, रुपेश सोनकडे या आरोपींविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. फिर्यादीची मोटार उभी होती. त्या मोटारीची काच फोडल्याबद्दल विचारणा करण्यास गेलेल्या फिर्यादीस, तसेच त्याचे सहकारी नीलेश मंगळवेढेकर, सचिन धोत्रे यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यांना जखमी केले. तर विशाल विजय जाधव (वय २२, पिंपळे गुरव) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नीलेश शंकर मंगळवेढेकर (वय २२), सतीश लक्ष्मण धोत्रे (वय ३०), सोमनाथ मच्छिंद्र धोत्रे (वय ४०), सूरज लक्ष्मण धोत्रे (वय २१), राहुल अनिल धोत्रे (वय २१), शंकर मच्छिंद्र धोत्रे (वय ३२, सर्व रा. धोत्रेचाळ, गणेशनगर) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In the group of two groups, the fight is to break the car's glass