देहूरोडमध्ये महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:28 IST2018-04-16T02:28:21+5:302018-04-16T02:28:21+5:30
येथील बुद्धविहारात रंगून येथून आणलेल्या बुद्धमूर्तीची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते स्थापना केली असल्याने, तसेच डॉ. आंबेडकर यांचे अस्थिस्तूपही असल्याने डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

देहूरोडमध्ये महामानवाला अभिवादन
देहूरोड - येथील बुद्धविहारात रंगून येथून आणलेल्या बुद्धमूर्तीची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते स्थापना केली असल्याने, तसेच डॉ. आंबेडकर यांचे अस्थिस्तूपही असल्याने डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ऐतिहासिक धम्मभूमीतील बुद्धविहार व देहूरोड कॅन्टोन्मेन्ट परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देहूरोड परिसरात सायंकाळनंतर भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.
देहूरोड शहर काँग्रेसच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात बोर्ड सदस्य व शहराध्यक्ष हाजीमलंग मारिमुत्तू यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी माजी उपाध्यक्ष यदुनाथ डाखोरे, मिकी कोचर, रेणू रेड्डी आदी उपस्थित होते . देहूरोड बामसेफच्या वतीने पांडुरंग फाळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . या वेळी बाळासाहेब धावारे, महादेव लोखंडे आदी उपस्थित होते . महाराष्ट्र झोपडपट्टी महासंघाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आली . वैशाली अवघडे यांनी संयोजन केले . आरपीआय (आठवले) यांच्या वतीने सुभाष चौकात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष लक्ष्मण ढिकाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . या वेळी युवक अध्यक्ष अमित छाजेड, रुतेश अलकोंडे, इंद्रपालसिंग , दिलीप कडलक आदी उपस्थित होते.
देहूरोड पोलीस ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक गणपत माडगूळकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी कॅन्टोन्मेंटचे सीईओ अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य गोपाळ तंतरपाळे, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे , पोलीस निरीक्षक अरुण मोरे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
तळेगावमध्ये व्याख्यान
तळेगाव दाभाडे : राव कॉलनी येथील बुद्धमय विचार मंचाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते अंकुश भेगडे, विलास भेगडे, बाळासाहेब लोंढे आदी उपस्थित होते. विशाल वाळुंज म्हणाले, ‘‘समाज परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अहोरात्र झटले. त्यांचे कार्य अद्वितीय होते. आपण त्यांचा विचार प्रवाह पुढे नेला पाहिजे. छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा जोतिबा फुले, शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी सर्व समाजाला बरोबर घेऊनच कार्य केले आहे. ते कार्य खरोखर दीपस्तंभासारखे आहे. मंचाचे अध्यक्ष अमोल गंगावणे यांनी स्वागत केले. या वेळी अॅड. विनय दाभाडे, राजेंद्र जाधव, तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल वाळुंज, संजय गरुड,अंकुश भेगडे, बाळासाहेब लोंढे आदींनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.
विकासनगरमध्ये कार्यक्रम
किवळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली भारतीय राज्यघटना हा एक सर्वोत्तम धर्मग्रंथ असून, अनेक जाती-धर्मांना उपयोगी पडणारा आहे. भारतीय राज्यघटनेमुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. सर्व जाती-धर्माचे लोक राज्यघटनेवर विश्वास ठेवत आहेत. सर्व समाजातील लोक डॉ. आंबेडकरांना आदर्श मानतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये डॉ बाबासाहेब प्रत्येक घरामध्ये पोहोचतील व एक दिवस हा भारत देश जातमुक्त होईल, असे प्रतिपादन महापालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब तरस यांनी विकासनगर येथे केले.
विकासनगर येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी तरस बोलत होते . त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. बुद्धपूजा, धार्मिक विधी उत्तमराव हिंगे यांनी पार पाडले. अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी स्वागत केले. या वेळी बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे, दत्तात्रय तरस , श्याम सिंधवानी , नारायण जरे , राजेश मांढरे , पंकज तंतरपाळे , विजय मोरे , बापू गायकवाड , चंद्रकांत शिंदे , चंद्रकांत वाघमारे , अजय बखारीया , सिंधू तंतरपाळे , मीनाक्षी वाघमारे , सुनीता मनोहरे उपस्थित होते. मंचाच्या वतीने देहूरोड-कात्रज महामार्ग, विकासनगर , एम बी कॅम्प, देहूरोड बाजारपेठमार्गे धम्मभूमीपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहूमहाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमांची वेगवेगळ्या तीन आकर्षक सजावट केलेल्या रथांतून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती . मंचाच्या पदाधिकारी व सभासदांनी संयोजन केले .
चांदखेड परिसरात उत्साह
चांदखेड : परिसरातील कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच छाया केदारी, पाचाणे येथे सरपंच संदीप येवले, आढले बुद्रुक येथे सरपंच विश्वास घोटकुले यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चांदखेड ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अमोल कांबळे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उपसरपंच पौरस बारमुख, ग्रामपंचायत सदस्य अंजली धावडेकर, अनिल दाभाडे, पोलीस स्टेशन एएसआय सूर्यकांत भागवत, ग्रामसेविका डोंगरे , पाणीपुरवठा समितीचे सचिव रामहरी गायकवाड, सिद्धान्त कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते. या प्रसंगी बौद्धाचार्य राहुल कांबळे यांनी बौद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांचे समाजाविषयीचे कार्य सांगितले.
व्याख्यानातून दिली माहिती
बुद्धविहार ट्रस्टच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धम्मभूमीवरील बुद्धविहारात साजरा करण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयासमोरील प्रांगणात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ट्रस्टचे कार्याध्यक्ष अॅड. गुलाब चोपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
धम्मभूमी येथील अस्थिस्तूपास ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ट्रस्टचे सहसचिव सुमेध भोसले यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील , धम्मवंदना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे, अॅड. चोपडे, संजय ओव्हाळ, रोहन गायकवाड आदींनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केले.
बुद्धविहार कृती समिती व धम्मभूमी सुरक्षा समिती यांच्या वतीने अशोक वाघमारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बोर्ड सदस्य रघुवीर शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अस्थिस्तूपास एन एस राक्षे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विजय गायकवाड यांच्या हस्ते बुद्धपूजा व बुद्धवंदना झाली.
या वेळी लहू शेलार, धर्मपाल तंतरपाळे, रमेश जाधव आदी उपस्थित होते. कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड, बोर्डचे सीईओ अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार , कैलास पानसरे, डी. पी. भोसले, दयानंद कांबळे , राजाराम भोसले , प्रकाश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले . विजय पवार यांनी सूत्रसंचालन केले . सायंकाळी धम्मभूमी ते पुतळ्यादरम्यान ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आल्या होत्या.
भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखेच्या वतीने धम्मभूमी ऐतिहासिक बुद्धविहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करण्यात आले. बुद्धपूजा (सुत्तपठण) व पूजापाठ होऊन डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. धूप व दीप प्रज्वलित केल्यानंतर अस्थिस्तूपाचे पूजन करण्यात आले . या वेळी शहर शाखांचे सर्व पदाधिकारी, संघटक, महिला प्रतिनिधी, उपासक-उपासिका व शहरातील नागरिक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रकाश ओव्हाळ होते. राहुल बढेकर यांनी सूत्रसंचालन केले.
समता सैनिक दलाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महिला, भगिनी शाखा व पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उपस्थित सर्वांना मिठाईवाटप झाले. संजय आगळे यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान मध्यरात्री बाराला सरचिटणीस राहुल बढेकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून बुद्धविहारपर्यंत कँडल मार्च करून सुत्तपठण करण्यात आले.