शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गावर फुलतेय हिरवळ, झाडांचे संवर्धन ठरतेय समाजाचे सामूहिक यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:45 IST

- चिंचोली ते अशोकनगर : ३५० हून अधिक झाडांची जोपासना स्थानिक नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि लष्करी प्रशासनाच्या सहकार्याने नियमितपणे 

- देवराम भेगडे

देहूरोड : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पहिला विसावा ठरणाऱ्या चिंचोली ते अशोकनगर मार्गावर आता हिरवाईने नटलेला एक सुंदर पालखी मार्ग पाहायला मिळतो आहे. या मार्गावर लावण्यात आलेल्या ३५० हून अधिक झाडांची जोपासना स्थानिक नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि लष्करी प्रशासनाच्या सहकार्याने नियमितपणे केली जात आहे.

पालखी सोहळा देहूगावातून निघाल्यावर चिंचोलीतील पादुका मंदिर परिसरात पहिला थांबा घेतो. येथे तुकोबांच्या अभंग आरतीनंतर हजारो वारकरी व भाविक यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी वारकरी काही वेळ विसावा घेतात, त्यामुळे परिसरात सावलीची मोठी गरज भासत होती.

ही गरज लक्षात घेऊन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे या मार्गावर झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला. सुरुवातीला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला, तर पुढे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने झाडांची नियमित देखभाल व सिंचन सुरू राहिले. यामध्ये चिंचोलीतील युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे.

आज या झाडांची वाढ चांगल्या प्रमाणात होत असून, चिंचोली ते अशोकनगर परिसर हरित पट्टा म्हणून विकसित होत आहे. लष्करी वसाहतीलगत असलेल्या या मार्गावरून दरवर्षी हजारो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. या झाडांमुळे आता त्यांना निसर्गस्नेही व सावलीचा मार्ग मिळत आहे. हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरकच नाही, तर सामूहिक प्रयत्नातून साधलेले एक यशस्वी उदाहरण आहे. पालखी मार्ग हरित करणारा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरतो आहे.

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Maharashtraमहाराष्ट्र