शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गुगल सर्च करून आखला ‘प्लॅन’;बेरोजगार उच्चशिक्षिताकडून बंदुकीच्या धाकावर चोरीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:12 IST

सांगवीतील घटनेने खळबळ : दोन भावांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात 

पिंपरी : बेरोजगार असलेल्या उच्चशिक्षिताने बंदुकीच्या धाकावर चोरी करण्याचा प्रयत्न केला. सांगवीतील पिंपळे गुरव येथील कल्पतरू इस्टेट फेज तीनमध्ये ३१ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. 

चांगबोई सेरतो कोम (४०, रा. एनआयबीएम कोंढवा, मूळ रा. मणिपूर), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. गगन सीताराम बडेजा यांनी याबाबत सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक नांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेला चांगबोई याला दरमहा एक लाख ३० हजार रुपये पगाराची आयटी कंपनीत नोकरी होती. मात्र, नोकरी गेल्याने ऑगस्ट २०२४ पासून तो बेरोजगार होता. चांगल्या पगाराची नोकरी असल्याने त्याने कोंढवा आणि उंड्री पिसोळी येथे फ्लॅट घेतला होता. दोन्ही फ्लॅटचे हप्ते सुरू आहेत. दरम्यान, वर्षभरापासून नोकरी नसल्याने बेरोजगार असलेला चांगबोई कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने पैसे मिळवण्याच्या उद्देशाने चोरीचा प्रयत्न केला. 

फिर्यादी गगन यांचे वडील सीताराम बडेजा हे कोंढवा येथील बँकेच्या शाखेत व्यवस्थापक आहेत. चांगबोई याने सीताराम यांचा पाठलाग करून त्यांच्या घरावर पाळत ठेवली. त्यानंतर ३१ जुलै रोजी सायंकाळी त्यांच्या घरी गेला. त्याने बडेजा यांच्या घराची बेल वाजवली. गगन यांच्या आईने दरवाजा उघडला, पण बाहेर कुणीच दिसले नाही. काही मिनिटांनी पुन्हा बेल वाजली. गगन यांनी दरवाजा उघडला. चोरटा चांगबोई समोर उभा होता.‘सीताराम बडेजा का पार्सल आया है. उनका आईडी कार्ड दिखाओ’, असे म्हणाल्याने गगन यांनी आयकार्ड आणण्यासाठी घरात जात असताना चांगबोई घरात शिरला. गगन यांनी त्याला हटकले. काही कळायच्या आत चांगबोईने बॅगेतून बंदूक काढली आणि गगन यांच्या कपाळाला लावली. घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने आणण्यास सांगितले. हॉलमध्ये काहीतरी सुरू आहे, म्हणून बेडरूमध्ये असलेला गगन यांचा भाऊ बाहेर आला, चांगबोईने बंदुक त्याच्या दिशेने धरली. त्यामुळे गगन आणि त्यांचा भाऊ घाबरला होता. तिघांमध्ये जोरदार झटापट झाली. दोन्ही भावांनी प्रतिकार केला. चांगबोईने कंबरेला असलेली कुकरी काढली. हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्यांच्यात झटापट झाली. अखेर गगन आणि त्यांच्या भावाने चांगबोईला धरून हात पाय बांधले. याबाबत माहिती मिळताच सांगवी पोलिसांना घटनास्थळी धाव घेत चांगबोईला ताब्यात घेतले. पोलिसांनी गगन आणि त्यांच्या भावाच्या धाडसाचे कौतुक केले. 

तीन महिन्यांपासून पाळत

चांगबोई याने तीन महिन्यांपूर्वी सीताराम बडेजा यांचा पाठलाग करून ते कुठे राहतात याची पाहणी केली होती. त्यानंतर ३१ जुलैला तो बसने नाशिक फाट्यापर्यंत आला. तेथून रिक्षाने थेट सोसायटीत गेला. सहाव्या मजल्यापर्यंत चालत गेला. घराच्या बाहेर दारू प्यायला. त्यानंतर त्याने बडेजा यांच्या घराची बेल वाजवली, असे पोलिसांनी सांगितले. 

गुगल सर्च करून आखला ‘प्लॅन’

बेरोजगार असल्याने चांगबोई याला पैशांची चणचण होती. त्यामुळे मोठी रक्कम मिळवण्यासाठी त्याने चोरीचा प्लॅन आखला. त्यासाठी पैसे कुठे असतात याबाबत गुगल सर्च करून माहिती घेतली. त्यावेळी बँकांमध्ये आणि लाॅकरमध्ये जास्त पैसे असतात, अशी माहिती त्याने मिळवली. त्यानुसार त्याने तो रहात असलेल्या कोंढवा परिसरातील बँकांमध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी एका बँकेत सीताराम बडेजा त्याला दिसले. त्यांच्या घरी रोकड तसेच मौल्यवान वस्तू असतील असे त्याला वाटले. 

बंदूक, १९ काडतुसे आणि कुकरी जप्त पोलिसांनी चांगबोई याच्याकडेन बंदुक, १९ काडतुसे आणि कुकरी जप्त केली. या बंदुकीसाठी मणिपूर येथील परवाना असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच हातबाॅम्ब (हॅण्डग्रेनेड) सारखे इलेक्ट्रिक वायर लावलेले प्लास्टिकच्या पाईपचे तीन ते चार तुकडे देखील चांगबोईकडे मिळून आले.  गगन आणि त्यांच्या भावाने चांगबोईचा प्रतिकार केला. चांगबोईवर याआधी गुन्हा दाखल नाही. आता तो येरवडा कारागृहात आहे. - अमोल नांदेकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सांगवी

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी