शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत बारावीच्या परीक्षेत मुलींचाच बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:27 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दुपारी एकला जाहीर झाला.

ठळक मुद्देशहराचा निकाल ८९.०९ टक्के, ३० महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के बारावीच्या परीक्षेला पिंपरी-चिंचवड शहरातील १७ हजार ४७४ विद्यार्थी

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहर, मावळ, खेड  व मुळशीतही मुलींनी बाजी मारली आहे. पिंपरी-चिंचवडचा निकाल  ८९.०९ टक्के इतका लागला आहे. त्यात मुलींचे प्रमाण ९३.०१ टक्के, तर मुलांचे प्रमाण ८५.८४ टक्के इतका लागला आहे. गतवर्षी बारावीचा निकाल ९०.८७  टक्के लागला होता दीड टक्कयांनी निकाल घटला आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दुपारी एकला जाहीर झाला. कला, वाणिज्य आणि विज्ञान आणि टेक्नॉलॉजी अशा शाखांसाठी शहरातील विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

निकाल असल्याने सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. बारा वाजल्यापासूनच मुले सायबर कॅफेमध्ये जागा धरून बसली होती. दुपारी एक वाजताच संकेतस्थळावर निकाल खुला केला. शहर ग्रामीण भागातील ३० महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्यावर्षी  ४७  महाविद्यालये शतकवीर ठरली होती. बारावीच्या परीक्षेला पिंपरी-चिंचवड शहरातील १७ हजार ४७४ विद्यार्थी बसले होते. त्यात मुले ९५४६ असून, मुलींची संख्या ७९२८ आहे. त्यांपैकी ७ हजार ३७४ मुले, तर ८१०४ मुली असे एकूण १५ हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची टक्केवारी ८५.९४ असून, मुलींची टक्केवारी ९३.०१  आहे. या व्यतिरिक्त पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल  २०.४१ टक्के लागला असून गेल्यावर्षी हा निकाल ३८.३५ टक्के लागला होता. सुमारे अठरा टक्यांनी घट झाली आहे. मावळचा निकाल ८४.९३ टक्के, तर मुळशीचा निकाल ८१.८३ टक्के, खेडचा निकाल ८४.९३ टक्के लागला आहे. मावळात मुलींचा निकाल ९१.९५, तर मुळशीत ८९.६७ टक्के, खेडमध्ये ९४.२२ टक्के लागला आहे.३० महाविद्यालये शतकवीर पिंपरी-चिंचवड, मावळ, मुळशी तालुक्यातील ३० कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक आहे. मराठी शाळांचा निकाल कमी लागला आहे. इंग्रजी शाळांतील टक्केवारी वाढतच आहे. त्यात तुलनेत मराठी शाळांची टक्केवारी कमी होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत आहे. ...........एकुण महाविद्यालये २२३ ................पिंपरी-चिंचवड-८२ हवेली -६२मावळ-३३मुळशी-१५खेड-३१..............मुलींचे प्रमाण ९३.०१ टक्के,मुलांचे प्रमाण  ८५.८४ टक्के

..... 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडResult Dayपरिणाम दिवसexamपरीक्षाSchoolशाळाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय