शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 19:04 IST

१२ वर्षाच्या मुलीवर घरात कोणीच नाही याचा गैरफायदा उठवित पित्यानेच अत्याचार केले.

ठळक मुद्देयाप्रकाराची कोणाकडे वाच्यता केल्यास पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी : पिंपळे निलख येथे जन्मदात्या बापाने स्वत: च्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीडित मुलीच्या आईने गावाकडे लातूर येथील चाकूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा मंगळवारी सांगवी पोलिसांकडे वर्ग झाला. त्यानुसार नराधम पित्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी आई-वडिलांबरोबर पिंपळे निळख येथे राहण्यास आली होती. दोन मुलीपैंकी छोट्या १२ वर्षाच्या मुलीवर घरात कोणीच नाही याचा गैरफायदा उठवित पित्यानेच अत्याचार केले. अवघ्या १२ वर्षाच्या मुलीने काही दिवस हे लैंगिक अत्याचार सहन केले. घडलेला सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. मात्र बापाने याप्रकाराची कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी पीडितेच्या आईला दिली होती. यामुळे याप्रकरणी तक्रार देण्यास विलंब झाला. सांगवी पोलीसांनी नराधम बापाला अटक केली आहे. पित्याकडून मुलीवर अत्याचार होत असल्याचा प्रकार फेब्रुवारी मध्ये मुलीच्या आईच्या लक्षात आला होता. मात्र, धमकी दिल्याने पीडित मुलीच्या आईला पोलिसांकडे तक्रार देण्यास विलंब झाला असे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस