शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शिक्षण सम्राट म्हणने चुकीचे - गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 02:11 IST

शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही.

पिंपरी - शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही. शिक्षण हा पेशा आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महापालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण झाले. त्या वेळी बापट बोलत होते. महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिवखाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिलाबाबर, सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, उषा काळे, राजू बनसोडे, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, सुवर्णा बर्डे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे उपस्थित होत्या.आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘शिक्षक गुणवंत कसा ठरवायचा हा मोठा प्रश्नच आहे़ कारण प्रत्येक शिक्षक हा गुणवंतच असतो. गुरू हे श्रेष्ठच असतात. शिक्षक समाजाबरोबर राहतो. प्रत्येक घटकाला बरोबर घेतो. महापालिकेच्या शाळेतील गुणवत्ता वाढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशाचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी महापालिका शाळेतून निर्माण व्हावेत. तसेच गुणवंत शिक्षकांची निवड करण्यासाठीच्या समितीत तज्ज्ञांची निवड करावी.’’महापौर जाधव म्हणाले,‘‘पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आहे. पालिकेच्या शाळेत या नगरीतील कष्टकऱ्यांची मुले शिकतात. पालिका शाळेतील मुलांचा माध्यमातून शहराचे नाव व्हावे.’’प्रास्ताविक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले.भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगली संस्कृती असून, त्याचे मूळ शिक्षकांपर्यंत जाते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे. शिक्षकांमुळेच मी यापदापर्यंत पोहोचलो. शिक्षक कधीच पुढारी झाला नाही. शिक्षकाने अनेक नेते घडविले. डॉक्टर, अभियंते, वकील निर्माण केले. शिक्षक विद्यार्थ्यांना आपली संपत्ती मानतात. शिक्षकांमुळेच आपणाला दिशा मिळते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे. माणसाचे वेतनावर मूल्यमापन ठरत नाही. शिक्षणावर त्याचे मूल्यमापन ठरविले जाते. शिक्षणाला सरकारने प्राधान्य दिले आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :Educationशिक्षणnewsबातम्या