गवार, फ्लॉवर, टोमॅटो, मटार महाग

By Admin | Updated: November 16, 2015 01:56 IST2015-11-16T01:56:59+5:302015-11-16T01:56:59+5:30

घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने बहुतेक फळभाज्यांचे भाव तेजीत राहिले. गवार, फ्लॉवर, ढोबळी मिरची, शेवगा, मटार, बीट, पावटा, कारली, टोमॅटो या भाज्यांचे भाव वाढले आहेत,

Gewar, Flower, Tomato, Peas expensive | गवार, फ्लॉवर, टोमॅटो, मटार महाग

गवार, फ्लॉवर, टोमॅटो, मटार महाग

पुणे : घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने बहुतेक फळभाज्यांचे भाव तेजीत राहिले. गवार, फ्लॉवर, ढोबळी मिरची, शेवगा, मटार, बीट, पावटा, कारली, टोमॅटो या भाज्यांचे भाव वाढले आहेत, तर हिरवी मिरची व घेवड्याच्या भावात घट झाली. पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत.
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी १४० ते १५० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील
आठवड्याच्या तुलनेत आवक कमी झाली. काही दिवसांपासून थंडी
वाढू लागली आहे. तसेच त्यापुर्वी उन्हाच्या तीव्रतेमुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी काही दिवसांपासून बाजारात भाज्यांचे आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने बहुतेक फळभाज्यांचे दर तेजीत आहेत.
मागील आठवड्याच्या तुलनेत गवारचे भाव प्रति दहा किलोमागे
२०० रुपयांनी टोमॅटोचे १०० ते
१५० रुपयांनी, ढोबळी मिरची व
बीटचे प्रत्येकी १०० रुपयांनी
शेवग्याचे १५० रुपयांनी, मटारचे ५०० रुपयांनी, पावट्याचे १०० रूपयांनी
तर फ्लॉवरचे भाव ४० रुपयांनी वाढले.
हिरवी मिरची व घेवड्याच्या भावात प्रत्येकी १०० रुपयांची
घट झाली. बाजारात रविवारी राजस्थान गाजर तसेच कार्तिक एकादशीमुळे काही प्रमाणात रताळ््याचीही आवक झाली.
(प्रतिनिधी)

Web Title: Gewar, Flower, Tomato, Peas expensive