शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad Crime | दरवाढीने सामान्य बेजार तरीही गॅसचा काळाबाजार सुरूच

By नारायण बडगुजर | Updated: April 15, 2023 17:40 IST

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एकाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : रहिवासी परिसरात लोकांच्या जीवितास धोका निर्माण करून घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरण्यात येत असल्याचे कारवाईतून समोर आले. आरोपीकडून ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.  परमेश्वर दयानंद माने (वय २६, रा. धावडेवस्ती, भोसरी, मूळ रा. आंबेगाव, ता. देवणी, जि. लातूर) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक जण रहिवासी परिसरात लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा पध्दतीने घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भगतवस्ती, साधना कॉम्पलेक्स, भोसरी येथील लक्ष्मी गॅस इंटरप्रायजेस दुकानामध्ये पडताळणी केली. त्यावेळी आरोपी हा घरगुती गॅसच्या मोठ्या टाकीमधील गॅस लहान टाक्यांमध्ये भरून विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून घरगुती वापराच्या गॅसच्या १० मोठ्या टाक्‍या, गॅसच्या २८ लहान टाक्या  अशा एकूण ३८ गॅस टाक्‍या, दोन गॅस विड्रॉल मशीन, एक वजनकाटा  असा एकुण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असूनसुध्दा परमेश्वर माने हा भरलेल्या सिलेंडरमधून धोकादायक पद्धतीने लहान टाक्यांमध्ये विनापरवाना गॅस भरत होता.  या गॅस टाक्या चढ्या दराने विक्री करताना आरोपी मिळून आला. त्यानुसार आरोपीच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपीला भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलिस कर्मचारी फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, विशाल भोईर, मारुती जायभाय, स्वप्नील महाले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड