शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

गावठी कट्टे, परदेशी बनावटीची पिस्तुले येतात कोठून; पिंपरीत गुन्हेगारांना राहिला नाही धाक

By विश्वास मोरे | Updated: May 25, 2023 17:53 IST

दिवसाढवळ्या गोळीबाराची पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पंधरा दिवसात दुसरी घटना

पिंपरी : चिखलीत भरदिवसा तरूणावर गोळीबार करण्याची घटना नुकतीच दुपारी घडली. दिवसाढळ्या हल्ले आणि गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. त्यांना रोखण्यात पोलीसदलास अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. पूर्ववैमनस्यांतून हल्ला करणे, किरकोळ कारणावरून हाणामारीच्या घटनांमध्येही पिस्तुले वापरण्यात येत आहेत. ही पिस्तुले येतात कोठून?  याचे मूळ शोधून त्यावर उपाय करण्यात अद्यापही पोलिसांना पूर्णपणे यश आलेले दिसत नाही. त्यामुळे कष्टकºयांची नगरी आता गुन्हेगारी कृत्यांमुळे कुप्रसिद्ध होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातून पिस्तुले येत असल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी आणि पिस्तुलांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयाची निर्मिती झाल्यानंतर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असे शहरवासीयांना वाटत होते. मात्र, गेल्या दीडवर्षांत गावठी कट्े आणि पिस्तुले आढळून येण्याच्या आठ घटना आयुक्तालय परिसरात घडल्या आहेत. तर मागील पंधरा दिवसांचा आढावा घेतल्यास तळेगाव दाभाडे येथे राजकीय नेते किशोर आवारे यांची पालिका भवनासमोर गोळ्या घालून तसेच कोयत्याने निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर चिखलीत सोन्या तापकीर या तरूणांवर गोळीबार करून खून करण्यात आला आहे.

या पोलिसठाण्यांमध्ये गुन्हे

मात्र, गेल्या दीडवर्षांत गावठी कट्े आणि पिस्तुले आढळून येण्याच्या आठ घटना आयुक्तालय परिसरात घडल्या आहेत.  त्यात चिंचवड, हिंजवडी, चाकण, चिखली, देहूरोड, आळंदी, तळेगाव दाभाडे या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पिस्तूल बाळगणारे आरोपी वारंवार आढळून आले आहेत. बेकायदा पिस्तूल बाळगणाºयांना एकदा पकडले जाते. बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल होतो. जामिनावर सुटल्यानंतर हे आरोपी पुन्हा शस्त्र खरेदी करतात. पिस्तूलविक्रीच्या या छुप्या बाजारपेठेची त्यांना चांगलीच माहिती असते. पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केले, तरी ते आणखी पिस्तूल मिळवितात, हे मूळ पोलिसांनी शोधायला हवे.

कोणत्या घटनांमध्ये आढळली पिस्तुले दहशत माजविण्यासाठ तलवारी नाचविण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच खून, धमकावणे आणि खंडणी वसुलीच्या प्रकरणात राजरोसपणे पिस्तुलाचा वापर केला जात आहे. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात आणि तसेच निर्जन ठिकाणी रस्त्यात अडवून लुटण्यासाठी पिस्तुलाचा किंवा खून आणि हल्ला करण्यासाठी पिस्तुले वापरली जातात. तसेच येथील जमीनीला सोन्याचा भाव आल्याने वाढदिवसाला हवेत गोळीबार करण्याच्या घटना उपनगरामध्ये घडलेल्या आहेत. याची नोंद पोलिसठाण्यातील गुन्हयांमध्ये नोंदविली गेली आहे.

उत्तर प्रदेशाशी पिस्तुलाचे कनेक्शन

पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाच्या आणि स्थानिक पोलिसांच्या कारवाईत केली जाते.  पिस्तूल, गावठी कट्टे विक्री करणारे आढळून येत आहेत. परराज्यांतून गावठी कट्टे, पिस्तूल आणली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्त