शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गौतमी पाटीलचा 'शो' अन् महिलांची तोबा गर्दी, लावण्यखणीलाही झाला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 09:46 IST

तिने कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले असून हा मला मिळालेला पहिलाच पुरस्कार असल्याचंही तिने म्हटले.  

पिंपरी चिंचवड/पुणे  - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात ट्रेंडिग असलेल्या आणि तिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असलेल्या खान्देश कन्या गौतमी पाटीलचा महिला दिनी पिंपरी चिंचवड येथे कार्यक्रम पार पडला. गौतमीच्या या कार्यक्रमाला पुरुषांपेक्षा महिलांचीच गर्दी मोठी होती, त्यामुळे या कार्यक्रमाची वेगळीच चर्चा होतेय. विशेष म्हणजे येथील कार्यक्रमात गौतमीला पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला. त्याबद्ददल तिने कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले असून हा मला मिळालेला पहिलाच पुरस्कार असल्याचंही तिने म्हटले.  

पिंपरी चिंचवडमध्ये गौतमी पाटीलचा जिथे कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमास महिलांची मोठी गर्दी होती. विशेष म्हणजे गौतमीच्या गाण्यांवर महिला आणि युवतीही थिरकल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, आपल्याला आनंद झाल्याचं तिने म्हटलंय. तसेच, काही जण कौतुक करतात, माझ्याबद्दल चांगलं बोलतात. पण, काही जण चांगलं म्हणत नाहीत, त्यांना बाय बाय... असे गौतमीने म्हटले. तसेच, ''माझ्या प्रत्येक शोला पुरुषांची संख्या अधिक असते. आज महिलांची संख्या अधिक होती. महिलाही माझ्या नृत्याचा आनंद घेत होत्या. मी एकटीच नृत्य करत होती असं नाही. त्यामुळे मला खूप खूप छान वाटत आहे,'' अशी भावना गौतमी पाटीलने व्यक्त केली.

लोकं चांगलं वाईट बोलतात यासंदर्भात पत्रकारांनी गौतमीला विचारलं असता, ''ज्याचे त्याचे विचार असतात दादा. आज काही लोक एक बोलत आहेत, तर काही लोक दुसरंच काही तरी बोलत आहेत. मला जे चांगलं म्हणतात त्यांना मी धन्यवाद करते आणि जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना बाय बाय'', असे तिने म्हटले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटीलची सोशल मीडियांत चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आपल्या ठसकेबाज लावणीने तिने रसिक चाहत्यांवर जादू केलीय. मात्र, तिच्या कार्यक्रमावर बंदी आणावी, अशी मागणीही काहीजण करत होते. 

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomen's Day Specialजागतिक महिला दिन